दूध उकळताना कोणत्या भांड्याचा वापर करावा हे फार महत्त्वाचे मानले जाते. काही भांड्यात दूध उकळणे धोकादायक मानले जाते. तसेच असे दूध प्यायल्याने विषबाधा होण्याचा धोकाही असतो.त्यामुळे कोणत्या भांड्यात दूध उकळले पाहिजे हे जाणून घेऊयात.
जेव्हा जेव्हा अन्न शिजवण्याचा विचार येतो तेव्हा स्वच्छतेसोबतच भांडी कोणती वापरावी हा देखील महत्त्वाचा विषय असतो. कारण जेवण बनवताना त्या भांड्यांचे कणही त्या भाज्यांमध्ये उतरत असतात. त्यामुळे आपण सर्व भाज्या पूर्णपणे स्वच्छ करतो. तसेच ते हेल्थी कसे बनेस याकडेही लक्ष देतो. पण हे बऱ्याच जणांना माहिती नसेल की ज्या धातूच्या भांड्यांमध्ये तुम्ही अन्न शिजवता, त्याचा तुमच्या आरोग्यावरही मोठा परिणाम होतो.
काही भांड्यांमध्ये दूध उकळवू नका
भाज्यांप्रमाणेच कधी दूधाबद्दल विचार केला आहे का? कारण भाज्यांपेक्षाही दूध हे सर्वात लवकर खराब होणारा पदार्थ आहे. त्यामुळे दूध तापवताना त्यात काही पडलं तरी देखील ते लगेच खराब होण्याची शक्यता असते. म्हणू दुधाच्याबाबतीत फार काळजी घ्यावी लागते. पण त्यासाठी भांड्यांचा पण तेवढा विचार गेला केला पाहिजे. नाहीतर असे दूध प्यायल्याने शरीरात विष पसरण्याची शक्यता असते. प्रत्येक घरात दूध हे उकळवलं जातं. पण ते नक्की कोणत्या भांड्यात उकळवणे चांगले आहे जेणेकरून प्यायलानंतर कोणताही धोका निर्माण होणार नाही. चला जाणून घेऊयात.
या भांड्यात कधीही दूध उकळवू नका….
तांब्याची भांडी
तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. पण चुकूनही दूध किंवा दुधाचे पदार्थ तांब्याच्या भांड्यात शिजवू नयेत किंवा ठेवू नयेत. तांब्यात दूध गरम करताच त्याचे कण दुधात विरघळते आणि दूध विषारी बनते.
पितळ्याची भांडी
जर पितळ्याच्या भांड्यांना आत कलई केलेली नसेल आणि पितळ्याचाच थेट पृष्ठभाग असेल तर चुकूनही त्यात दूध शिजवू नका. पितळ्याच्या भांड्यात बनवलेला कोणताही प्रकारचा दुधाचा चहा किंवा दुधाची खीर खराब होते किंवा ते विषासारखे असते.
सम्बंधित ख़बरें





अॅल्युमिनियमची भांडी
अॅल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये दूध उकळणे किंवा शिजवणे सुरक्षित मानले जाते. पण तसे नाही. अॅल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये दीर्घकाळ दूध उकळवल्याने दुधात अॅल्युमिनियमचे प्रमाण वाढते. ज्यामुळे अल्झायमर रोगासारखे आजार होण्याचा धोका वाढतो. अॅल्युमिनियमच्या भांड्याची नीट स्वच्छचा देखील फार गरजेची असते अन्यथा त्याचे घटक दुधात उतरतात त्यामुळे असे दूध पिणे शरीरासाठी हानिकारक असते.
स्टीलची गुणवत्ता
फूड ग्रेड असलेल्या स्टीलची गुणवत्ता सुरक्षित नाही. त्यात दूध शिजवणे किंवा उकळणे देखील सुरक्षित नाही. भांड्यांमध्ये असलेले धातू दुधात उतरू शकतात आणि ते विषारी बनते
काचेचे भांडे
काचेच्या भांड्यांमध्ये दूध उकळवणे सुरक्षित असते. हे अप्रतिक्रियाशील असते. त्यामुळे दुधात काहीही मिक्स होत नाही. उच्च दर्जाच्या आणि फूड ग्रेड स्टीलमध्ये दूध उकळणे सुरक्षित असते.