बिअर पिल्याने किडनी स्टोन गायब होतो? नेमकं सत्य काय आहे? जाणून घ्या

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

अनेकजण आवडीने बिअर पितात. थोड्या प्रमाणात बिअर पिणे हे शरीरासाठी फायद्याचे असल्याचे बोलले जाते. त्यामुळे नेमके सत्य काय ते जाणून घेऊ या…

Beer Consumption And Body Health : बिअरचं नाव घेताच अगोदर पार्टी, दंगा आणि मस्ती असं काही आठवतं. अनेकदा मित्र एकत्र आले की बिअर पित त्यांच्या चांगल्या गप्पा रंगतात. मात्र बिअर पिणे हे आनंद साजरा करण्याचे एक माध्यम मानले जात असले तरी या मद्याचा शरीरावर काय परिणाम होतो? याबाबत अनेकांना माहिती नसते. बिअरबाबत अनेकांच्या मनात भ्रामक संकल्पना आहेत. त्यामुळे आता बिअर पिल्याने शरीरावर नेमका काय परिणाम होतो? हे जाणून घ्या.

बिअरमुळे शरीरावर नेमके काय परिणाम होतात आणि ती पिणे योग्य आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी न्यूज 18 हिंदीने नेफ्रोलॉजी एक्स्पर्ट डॉ. संदीप गर्ग यांच्याशी बातचित केली.

बिअर पिल्याने मुत्रपिंड साफ होते का? नेमकं सत्य काय?

डॉ. संदीप गर्ग यांनी बिअरबाबत अनेक भ्रामक संकल्पना आहेत, असे सांगितले. बिअरचे सेवन केल्याने किडनी स्टोन नष्ट होतो असे सांगितले जाते. तुम्हीही कधी हे वाक्य ऐकले असेल. बिअर पिल्याने मुत्रपिंड साफ होते, असेही काही लोक दावा करतात. याबाबत डॉ. संदीप गर्ग यांनी सविस्तर सांगितले आहे. बिअर पिल्याने मुत्रपिंड साफ होते, किडनी स्टोन निघून जातो, या दाव्याला कोणताही आधार नाही. तुम्ही शरीराला लागणारे पाणी पिले तरीदेखील कधीकधी किडनी स्टोन निघून जातो. उलट बिअर ही शरीरासाठी हानीकारक असते. बिअर प्यायल्याने शरीराचे नुकसान होते, असी माहिती डॉ. संदीप यांनी दिलीय.

बिअर शरीरासाठी फायदेशीर असते का?

थोड्या बिअरचे सेवन करणे हे शरीरासाठी फायद्याचे असते, असा दावा केला जातो. मात्र या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या म्हणण्यांनुसार बिअरच्या सेवनाने शरीरावर नकारात्मक परिणाम पडतो. बिअरचे सेवन करण्याचे प्रमाण वाढले तर शरीराचे नुकसान होते. वजन वाढू शकते. मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे बिअरचे सेवन न करणेच कधीही चांगले असते, असे सांगितले जाते.

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही यातील कोणत्याही माहितीचा दावा करत नाही किंवा समर्थनही देत नाही. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon