Navi Mumbai News: गुगल मॅपने घात केला, पुलाखालचा रस्ता घेतला अन् गाडी खाडीत पडली, बेलापूरमध्ये भयंकर घटना

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Mumbai News: मॅपच्या आधारे जात असतानाच जेट्टीला सुरक्षा कठडा नसल्याने कार त्याठिकाणी न थांबता थेट खाडीत पडली. हा प्रकार जवळच असलेल्या सागरी सुरक्षा पोलिसांच्या निदर्शनात आला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

नवी मुंबई : आपण रोजच्या जीवनात अनेक वेळा गुगल मॅपच्याआधारे आपल्याला हव्या असलेल्या ठिकाणी आपण पोहोचचो, मात्र अशा घटना अनेकदा घडतात की गुगल मॅपच्या सहाय्याने जात असतानाही आपण चुकतो, अशीच एक घटना समोर आली आहे, मात्र या वेळी हे प्रकरण चांगलंच अंगलट आलं असतं आणि एकाचा जीव गेला असता. गुगल मॅपच्या आधारे उलवेला जाणारी भरधाव कार थेट खाडीत कोसळल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास बेलापूरमध्ये घडली. घटनेवेळी तिथे उपस्थित असलेल्या सागरी सुरक्षा पोलिसांनी वेळीच महिलेचे प्राण वाचवले. शिवाय क्रेनच्या साहाय्याने खाडीत पडलेली कार देखील बाहेर काढण्यात आली. खाडीतून कार बाहेर काढत असतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावरती मोठ्या प्रमाणावरती व्हायरल होताना दिसत आहे.

नेमकं काय घडलं?

गुगल मॅप आधारे प्रवास करणाऱ्या वाहनांचे अनेकदा अपघात होत असल्याच्या घटना आपण ऐकतो, पण अशीच घटना नवी मुंबईत देखील शुक्रवारी मध्यरात्री (शुक्रवारी पहाटे 1 वाजता) घडली आहे. एक महिला तिच्या कारमधून प्रवास करत उलवेच्या दिशेने चालली होती. मात्र बेलापूर येथील खाडीपुलावर जाण्याच्या ऐवजी त्यांनी पुलाखालील मार्ग घेतला. यामुळे गुगल मॅपवर दिसत असल्याप्रमाणे तिथे सरळ रस्ता असल्याचे त्या महिलेला वाटले. यामुळे सरळ जात असताना महिलेची कार थेट ध्रुवतारा जेट्टीवर जाऊन खाडीत कोसळली. जेट्टीला सुरक्षा कठडा नसल्याने कार त्याठिकाणी न अडता थेट खाडीमधील पाण्यामध्ये पडली.

ही घटना घडली त्या परिसराच्या जवळच असलेल्या सागरी सुरक्षा पोलिसांच्या निदर्शनात ही बाब आली. यामुळे सागरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता, कारमधील महिला वाहत जात असल्याचे त्यांना दिसून आले. त्यांना गस्ती व रेस्क्यू बोटीच्या साहाय्याने बाहेर काढून त्यांचा प्राण वाचवण्यात आला. तर खाडीत पडलेली कार क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आली. गुगल मॅपवर रस्ता पाहत जात असताना रस्ता संपून पुढे जेट्टी असल्याचे न कळल्याने हा अपघात घडल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले. दरम्यान सागरी सुरक्षा पोलिस चौकीच्या समोरच ही दुर्घटना घडल्याने वेळीच महिलेला मदत मिळाली आणि महिलेचे प्राण वाचले.

 

 

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon