मेथीचे पाणी औषधापेक्षा कमी नाही, दररोज सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने मिळतील ‘हे’ 5 फायदे

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या स्वयंपाकघरात असलेली मेथीचे दाणे तुमच्या आरोग्यासाठी वरदान ठरू शकते. कारण मेथीमध्ये असे अनेक गुणधर्म आहेत जे आरोग्याच्या समस्या दूर करण्यात खूप उपयुक्त ठरू शकतात. सकाळी रिकाम्या पोटी मेथीच्या दाण्यांचे पाणी पिण्याचे फायदे जाणून घेऊया.

मेथी दाणे आपल्या भारतीय स्वयंपाक घरात सहज उपलब्ध होणारा पदार्थ आहे. हे मेथीचे दाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी आहेत. कारण यामध्ये इतके लपलेले गुण आहेत की ते आपल्या आरोग्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही. स्वयंपाकघरात मसाल्याच्या स्वरूपात अनेक पदार्थांमध्ये याचा वापर केला जातो. तसेच, अनेक आरोग्य समस्या दूर करण्यासाठी देखील मेथीचे दाणे खूप उपयुक्त आहे. विशेषतः रात्रभर भिजवलेले मेथीचे पाणी.

मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून त्याचे पाणी सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी प्यायल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. 21 दिवस सतत मेथीचे दाण्याचे पाणी प्यायल्यास तुम्हाला कोणते फायदे मिळू शकतात ते जाणून घेऊया.

वजन कमी करण्यास उपयुक्त

मेथीच्या बियांमध्ये सॉल्यूबल फायबर भरपूर प्रमाणात असते, जे पचन प्रक्रिया मंदावते आणि तुम्हाला बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते. यामुळे अनहेल्दी नाश्ता खाण्याची इच्छा कमी होते आणि वजन नियंत्रित राहण्यास मदत होते . तसेच, मेथीचे पाणी चयापचय वाढवते, ज्यामुळे फॅट बर्न होण्यास मदत होते.

मधुमेह नियंत्रित करण्यास उपयुक्त

मेथीच्या बियांमध्ये गॅलेक्टोमनन हे संयुग असते. जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. तसेच इन्सुलिन संवेदनशीलता वाढवते आणि कार्बोहायड्रेट्सचे शोषण कमी करते. टाइप-2 मधुमेहाच्या रुग्णांना दररोज सकाळी मेथीचे पाणी पिण्याचा फायदा होऊ शकतो.

पचनसंस्था मजबूत करते

मेथीचे पाणी आम्लपित्त, बद्धकोष्ठता आणि गॅस सारख्या पचनाच्या समस्या दूर करण्यासाठी प्रभावी आहे. त्यात असलेले फायबर अन्नाचे पचन सुलभ करण्यास मदत करते आणि आतडे स्वच्छ करते. जर तुम्हाला अपचन किंवा पोटदुखीचा त्रास होत असेल तर मेथीचे पाणी एक नैसर्गिक उपाय म्हणून काम करू शकते.

कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते

मेथीच्या बियांमध्ये सॅपोनिन संयुगे असतात, जे कोलेस्टेरॉलचे शोषण कमी करतात. मेथीचे पाणी नियमितपणे प्यायल्याने खराब कोलेस्टेरॉल (LDL)ची पातळी कमी होते आणि चांगले कोलेस्टेरॉल (HDL)वाढते. यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.

त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर

मेथीच्या पाण्यात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे त्वचेला मुरुम आणि सुरकुत्याच्या समस्या दूर करतात. तसेच शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकून ते चेहऱ्यावर चमक आणते. तर या मेथीच्या बियांचे पाणी प्यायल्याने केस गळणे देखील कमी होते आणि केस मजबूत आणि जाड होतात.

मेथीचे पाणी कसे बनवायचे?

एक चमचा मेथीचे दाणे रात्रभर एका ग्लास पाण्यात भिजत ठेवा.

हे पाणी गाळून सकाळी प्या.

जर तुम्हाला चव आवडत नसेल तर तुम्ही त्यात मध किंवा लिंबाचा रस मिक्स करू शकता.

गर्भवती महिलांनी तसेच ज्यांच्या शरीरात रक्तातील साखर कमी असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच मेथीचे पाणी प्या.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon