नाश्त्यासाठी बनवा सुपरहेल्दी आणि चविष्ट शेवग्याच्या पानांचा पराठा, जाणून घ्या Recipe

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Moringa Leaves Paratha Recipe in Marathi: सुपरफूड शेवग्याच्या पानांचा पौष्टिक पराठा हा सकाळची सुरुवात करण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.

How to Make Moringa Leaves Paratha Recipe: शेवग्याची पाने ही निसर्गाने दिलेली एक अमूल्य देणगी आहे. ‘सुपरफूड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पानांमध्ये प्रथिने, कॅल्शियम, लोह, अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्स मुबलक प्रमाणात असतात. रोजच्या आहारात या पानांचा समावेश करण्याचा एक चवदार आणि सोपा मार्ग म्हणजे शेवग्याच्या पानांचा पराठा. हा पराठा फक्त आरोग्यासाठी चांगला नाही, तर खूपच स्वादिष्ट, सुगंधी आणि पचायला हलकाही आहे. नाश्त्यासाठी, डब्यासाठी किंवा हलक्याश्या जेवणासाठी हे एक परफेक्ट पर्याय आहे. कमी वेळात, थोडक्या साहित्याने आणि भरपूर पौष्टिकतेसह बनणारा हा पराठा तुमच्या आहारात नक्कीच हिट ठरेल. चला याची रेसिपी जाणून घेऊयात…

लागणारे साहित्य

गव्हाचे पीठ – 2 कप

शेवग्याची कोवळी पाने – 1 कप (स्वच्छ धुऊन, बारीक चिरून)

 

हळद – ½ टीस्पून

लाल तिखट – 1 टीस्पून

जिरे पूड – ½ टीस्पून

ओवा (ऐच्छिक) – ¼ टीस्पून

मीठ – चवीनुसार

तूप किंवा तेल – पराठा भाजण्यासाठी

पाणी – पीठ मळण्यासाठी

किसलेले गाजर / चिरलेला कांदा – ¼ कप

साजूक तूप – चव वाढवण्यासाठी

जाणून घ्या कसे बनवायचे पराठे?

शेवग्याची पाने स्वच्छ धुऊन, सुकवून बारीक चिरून घ्या. फार जाड देठ नकोत.

एका परातीत गव्हाचं पीठ घ्या. त्यात चिरलेली मोरिंगा पाने, हळद, तिखट, जिरे पूड, ओवा (हवे असल्यास), मीठ आणि गाजर/कांदा घाला. थोडं-थोडं पाणी घालून पीठ मळून घ्या. पीठ थोडंसं घट्ट मळा. झाकून 15 मिनिटं ठेवा.

पीठाच्या गोळ्या करून त्याचे गोल पराठे लाटा. लाटताना पिठाला हलकं सुकं पीठ लावलं तरी चालेल.

गरम तव्यावर पराठा टाका. दोन्ही बाजूंनी मध्यम आचेवर तूप/तेल लावून कुरकुरीत होईपर्यंत भाजा. दोन्ही बाजूंना हलके सोनेरी डाग दिसले पाहिजेत.

गरमागरम पराठे दही, लोणचं किंवा एखाद्या चटणीसोबत सर्व्ह करा.

‘या’ टिप्स फॉलो करा 

मुलांसाठी गाजर, पनीर किंवा किसलेलं चीज घालून चव आणि पौष्टिकता वाढवू शकता.

हे पराठे डब्यासाठीही उत्तम आहेत, कारण हे लवकर खराब होत नाहीत.

तव्यावर भाजताना तुपाचा थोडासा वापर केल्यास चव वाढवतो.

इतर बातम्या

Heart Attack Signs On Face: हार्ट अटॅक येण्याआधी चेहऱ्यावर दिसतात ‘ही’ लक्षणं; वेळीच ओळखल्यास वाचू शकतो जीव

नारळ पाणी प्यायल्यामुळे तुमच्या पोटाचं आरोग्य राहिल निरोगी जाणून घ्या फायदे

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon