विकेंडला बनवा फ्राईड राईस! झटपट आणि पोटभरीची आहे Recipe

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Easy Fried Rice in Marathi: आज जाणून घ्या एकदम सोप्या पद्धतीने बनणारी घरगुती फ्राईड राईस रेसिपी, जी तुम्ही अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात तयार करू शकता.

How to make veg fried rice: जेव्हा झटपट, चविष्ट आणि पोटभर जेवणाची इच्छा असते तेव्हा फ्राईड राईस ही एकदम परफेक्ट रेसिपी ठरते. भात, काही भाज्या आणि थोडेसे मसाले वापरून काही मिनिटांत तयार होणारा हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. विशेषतः उरलेला भात वापरून जर काहीतरी वेगळं आणि चवदार बनवायचं असेल, तर ही रेसिपी नक्कीच करून पाहा. चला तर मग आज आपण पाहणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने बनणारी घरगुती फ्राईड राईस रेसिपी, जी तुम्ही अगदी कमी वेळात आणि थोड्याच साहित्यात तयार करू शकता.

सोपी फ्राईड राईससाठी लागणारे साहित्य 

शिजवलेला भात – २ कप (थंड झालेला)

गाजर – १ (छोटे तुकडे करून)

शिमला मिरची – ½ (छोटे तुकडे)

कांदा – १ (बारीक चिरलेला)

कोबी – ½ कप (किसून)

हिरव्या मिरच्या – १-२ (ऐच्छिक)

आले-लसूण पेस्ट – १ चमचा

सोया सॉस – १ चमचा

व्हिनेगर – ½ चमचा

मिरपूड – ¼ चमचा (किंवा चवीनुसार)

मीठ – चवीनुसार

तेल – २ चमचे

हिरवी कोथिंबीर (सजावटीसाठी)

जाणून घ्या कृती 

सगळ्या भाज्या धुवून छोटे तुकड्यात चिरून घ्या. भात अर्धा कच्चा शिजवून घ्या आणि  पूर्णपणे थंड करून घ्या.

कढईत तेल गरम करा. त्यात बारीक चिरलेला कांदा टाका आणि पारदर्शक होईपर्यंत परतून घ्या.

त्यात आले-लसूण पेस्ट घाला आणि सुगंध येईपर्यंत परता.

आता गाजर, कोबी, शिमला मिरची आणि हवे असल्यास हिरव्या मिरच्या घालून २-३ मिनिटं मध्यम आचेवर परता. भाज्या खमंग पण थोड्या कुरकुरीत होऊ द्या.

नंतर त्यात सोया सॉस, व्हिनेगर, मिरपूड व मीठ घाला आणि एकत्र करा.

शेवटी थंड झालेला भात त्यात घालून सर्व साहित्य नीट मिसळा. २-३ मिनिटं परतून घ्या.

हिरवी कोथिंबीर घालून  गरमागरम सर्व्ह करा.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon