RCB vs PBKS IPL 2025 Final : विराटची टीम RCB चॅम्पियन बनताच मुंबईचा कॅप्टन हार्दिक पंड्या का रडला?

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

RCB vs PBKS IPL 2025 Final : आयपीएल 2025 च्या फायनल मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पंजाब किंग्स विरुद्ध 6 धावांनी बाजी मारली. आरसीबीच्या या ऐतिहासिक विजयानंतर मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पंड्याने सोशल मीडियावर एक पोस्ट केली. ती आता व्हायरल झालीय.

IPL 2025 चा अंतिम सामना खूप रोमांचक ठरला. या मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पंजाब किंग्सला 6 धावांनी हरवून पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली. या विजयासह आरसीबीची आयपीएल चॅम्पियन बनण्याची 17 वर्षांची प्रतिक्षा सुद्धा संपुष्टात आली. या विजयानंतर आरसीबीला जगभरातून विजयाच्या शुभेच्छा मिळत आहेत. यात मुंबईच इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पंड्या सुद्धा आहे. आरसीबी चॅम्पियन बनल्यानंतर हार्दिक पंड्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली. यात तो खूप इमोशनल दिसला.

हार्दिक पंड्या RCB च्या विजयानंतर भाऊ क्रुणाल पंड्यासाठी इमोशनल झालेला. त्याने भावासाठी इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली. आरसीबीच्या या विजयाचा हिरो क्रुणाल पंड्या ठरला. त्याने आपल्या शानदार प्रदर्शनाच्या बळावर आरसीबीला ही ट्रॉफी मिळवून दिली. आपल्या भावाच्या या प्रदर्शनाने इमोशनल झालेल्या हार्दिक पंड्याने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली. हार्दिकच्या या कृतीने सर्वांच मन जिंकलं.

सोशल मीडियावर ही स्टोरी व्हायरल

मॅचनंतर हार्दिक पंड्याने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर क्रुणाल पंड्याचा एक फोटो शेअर केला. यात त्याने लिहिलय की, ‘आता डोळ्यातून अश्रू वाहतायत, तुझा अभिमान वाटतो भावा’. या पोस्टमधून फक्त खिलाडूवृत्ती नाही, तर दोन्ही भावांमधील बाँड किती मजबूत आहे, ते दिसून येतं. हार्दिक पंड्या या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सचा कॅप्टन होता. क्वालिफायर 2 च्या मॅचमध्ये पंजाब किंग्सने त्यांचा पराभव केला. त्यामुळे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं. आता भावाच्या विजयाने हार्दिकला भावूक बनवलं. सोशल मीडियावर ही स्टोरी व्हायरल झाली.

त्याच्या टाईट बॉलिंगने पंजाबवर दबाव वाढवला

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या फायनल सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी केली. त्यांनी 190 धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाब किंग्सने चांगली सुरुवात केली. पण क्रुणाल पंड्या गोलंदाजीला येताच त्याने आपल्या फिरकीने सामन्याची दिशाच बदलली. त्याने 4 ओव्हरमध्ये फक्त 17 धावा देऊन 2 विकेट काढल्या. यात प्रभसिमरन सिंह (26 रन) आणि जोश इंग्लिस (39 रन) या दोन महत्वाच्या विकेट आहेत. त्याच्या टाईट बॉलिंगने पंजाबवर दबाव वाढवला आणि आरसीबीने हा सामना 6 धावांनी जिंकला. या प्रदर्शनसाठी क्रुणालला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्कार मिळाला.

हे सुद्धा वाचा

आमदार बाबासाहेब देशमुख यांची राज्याच्या धर्मादाय खाजगी रुग्णालय तपास समिती संचालक पदी निवड

सांगोला शहर व तालुक्यातील घडामोडी एका क्लिकवर; बुधवार दि.4 जून 2025

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon