सांगोला विद्यामंदिर मध्ये पारितोषिक वितरण संपन्न

सांगोला (वार्ताहर) सांगोला विद्यामंदिर प्रशालेमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन 2024-25 मध्ये उर्वरित पारितोषिक वितरण संपन्न झाले. स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित हस्ताक्षर स्पर्धा, निबंध स्पर्धा, वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये 100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे, 400 मीटर धावणे, 800 मीटर धावणे, थाळीफेक, चेंडूफेक, गोळाफेक, भालाफेक, सांघिक क्रीडा प्रकारामध्ये खो-खो, कबड्डी स्पर्धा, कला प्रदर्शन, रांगोळी प्रदर्शन, विज्ञान वस्तू प्रदर्शन, वर्ग-प्रतिनिधी व विद्यार्थी-शिक्षकदिन यासारख्या विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांच्या विद्यार्थ्यांना पारितोषिकांसह प्रमाणपत्रे देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते गौरवण्यात आले.
याप्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य अमोल गायकवाड, पर्यवेक्षक प्रदीप धुकटे, मच्छिंद्र इंगोले यांच्यासह ज्येष्ठ शिक्षक मिलिंद फाळके, उत्तम सरगर ,काकासाहेब नरुटे, वरिष्ठ लिपिक हेमंत नलवडे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक प्रदीप धुकटे, आभार पर्यवेक्षक मच्छिंद्र इंगोले, सूत्रसंचालन वैभव कोठावळे व पारितोषिक वाचन चैतन्य कांबळे आणि आशुतोष नष्टे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पारितोषिक वितरण विभागातील वैभव कोठावळे, सिताराम राऊत, निलेश जंगम, उमेश नष्टे, रोहिणी शिंदे, कविता राठोड, नागेश पाटील, स्वाती चांदणे, श्रीकृष्ण वाघमारे, अमोल रणदिवे, परी मुलाणी, मारुतीराव बोरकर, सायकल बँक विभागाचे राजेंद्र ढोले व उत्सव विभागाचे नरेंद्र होनराव यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
सायकल बँकेमध्ये सायकल्स प्रदान
कै.कमल सुधाकर होनराव व कै.श्रीनंद श्रीकांत घोंगडे यांच्या स्मरणार्थ नरेंद्र होनराव सर व प्रतिष्ठित व्यापारी श्रीकांत घोंगडे यांचेकडून सांगोला विद्यामंदिर सायकल बँकेस सहकार्य म्हणून सायकल्स देण्यात आल्या. प्रशालेमधील गरीब, गरजू व हुशार विद्यार्थ्यांना त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत मोफत सायकल वापरण्यास दिल्या जातात. यावेळी होनराव व घोंगडे कुटुंबीयांना धन्यवाद देण्यात आले.