टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

मोठी बातमी : पंढरपुरात पूजेसाठी गेलेले तीन महाराज मंदिरात अडकले, आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून बचावकार्य सुरु

Pandharpur Rain : पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथे भीमा नदी पात्रात असलेल्या महादेव मंदिरामध्ये तीन महाराज अडकल्याची घटना घडली आहे.

Pandharpur Rain : पंढरपूर तालुक्यात (Pandharpur News) मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरु असल्याने भीमा नदीची (Bhima River) पातळी कमालीची वाढली आहे. त्यातच आता एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. गुरसाळे येथे भीमा नदी पात्रात असलेल्या महादेव मंदिरात (Mahadev Mandir) तीन महाराज अडकल्याचे समोर येत आहे. आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management) पथकाकडून बचावकार्य सुरु करण्यात आले आहे.

सुभाष ढवन, विठ्ठल लोहकरे आणि जाधव महाराज असे या महाराजांची नावे आहेत. आज सकाळी पूजेसाठी हे तीन महाराज मंदिरात गेले होते. मात्र त्यानंतर पाणी वाढत गेलं आणि यांना बाहेर येता आले नाही. त्यानंतर त्यांनी मदतीला गावकऱ्यांना सांगितल्यावर गावकऱ्यांनी प्रशासनाची संपर्क साधला.

आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून बचावकार्य सुरु

त्यानंतर थोड्याच वेळात आपत्ती व्यवस्थापनाची टीम घटनास्थळी दाखल झाली. हे तीन महाराज सुरक्षित असल्याची माहिती समोर येत आहे. तीनही महाराज मंदिराच्या बाहेरच आहेत. मंदिर चढावर असल्यामुळे तिथे अजून पाणी पोहोचले नाही, मात्र त्यांना बाहेर येता येत नसल्यामुळे त्यांना काढण्यासाठी आता आपत्ती व्यवस्थापनाची टीम पोहोचली आहे. पुढील काही वेळेत त्यांना सुरक्षित रितीने बाहेर काढले जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

अकलूजमध्ये नीरा नदीचे उग्र रूप

दरम्यान, अकलूजमध्ये ऐन मे महिन्यात नीरा नदीचे उग्र रूप पाहायला मिळत आहे. मे महिन्यात कायम कोरडी पडणारी नीरा नदी आज दुथडी भरून वाहू लागलेली आहे . आज सकाळी अकलूज येथील अकलाई मंदिरात पाणी शिरले आहे. नीरा नदीच्या काठावर असणाऱ्या या अकलाई मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे. आज अमावस्येच्या निमित्त दर्शनाला आलेल्या अकलूजकरांनी नीरेचे हे रौद्ररूप पाहण्यासाठी गर्दी केली आहे. ज्या मे महिन्यात पक्ष्यांनाही प्यायला पाणी नसते, तिथे असले उग्ररूप कधीच पाहायला मिळाले नसल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

दुकानाबाहेर बेवारस बॅग, पोलीस धावले, मुंबईत मोठी खळबळ

पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराचा भडका, 24 तासांत TMC च्या दोन बड्या खासदारांवर जीवघेणा हल्ला, डोक्याला गंभीर दुखापत

Beed Accident News: मनोज जरांगेंचे उपोषण सुटल्यानंतर दुःखद घटना, अंतरवालीहून परतताना उभ्या ट्रकला कारची धडक; मराठा आंदोलकाचा मृत्यू, दोघे गंभीर

यालाच म्हणतात मस्ती… डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोने खळबळ, इराणसोबतच्या चर्चेदरम्यानच..

रुग्णालयात दाखल होताच मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा, म्हणाले आता सरकारने…

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी धक्कादायक बातमी! तब्बल इतक्या लाख महिलांना 1500 रुपये मिळणार नाहीच, सरकारचा मोठा निर्णय