टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Raid 2 Box Office Collection Day 10: ‘रेड 2’चा बॉक्स ऑफिसवर भूकंप, दुसऱ्या शनिवारी छप्पडफाड कमाई

Raid 2

Raid 2 Box Office Collection Day 10: ‘रेड 2’ ला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळतोय. दुसऱ्या शनिवारी चित्रपटाच्या कमाईत वाढ झालीय.

Raid 2 Box Office Collection Day 10: अजय देवगणच्या ‘रेड 2’ (Raid 2) चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर (Box Office) चांगला प्रतिसाद मिळतोय. या चित्रपटानं 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे आणि अजूनही तो बॉक्स ऑफिसवर छप्पडफाड कमाई करतोय. चित्रपटानं दहाव्या दिवशी जोरदार कलेक्शन केलं.

दुसऱ्या शनिवारी ‘रेड 2’ ची कमाई

सॅक्निल्कच्या अहवालानुसार, चित्रपटानं दुसऱ्या शनिवारी 8 कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली आहे. दरम्यान, दुसऱ्या शनिवारी झालेल्या कमाईचे हे आकडे अद्याप अधिकृत नाहीत. पण जर चित्रपटानं दहाव्या दिवशी 8 कोटींची कमाई केली असेल, तर आतापर्यंत चित्रपटाचं एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 108.75 कोटी झालं आहे.

 

‘रेड 2’चं बॉक्स ऑफिस कलेक्शन

‘रेड 2’ ची ओपनिंग 19.25 कोटी होती. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 12 कोटी रुपये कमावले. तिसऱ्या दिवशी चित्रपटाची कमाई वाढली आणि चित्रपटाने 18 कोटी रुपये कमावले. चौथ्या दिवशी या चित्रपटाने 22 कोटी रुपये कमावले. पाचव्या दिवशी चित्रपटाच्या व्यवसायात मोठी घसरण झाली. या चित्रपटाने फक्त 7.5 कोटी रुपये कमावले. सहाव्या दिवशी चित्रपटाने 7 कोटी रुपये कमावले. आठव्या दिवशी या चित्रपटाने 5.25 कोटी रुपये कमावले.

पहिल्या आठवड्यात या चित्रपटानं 95.75 कोटी रुपये कमावलेत. त्यानंतर नवव्या दिवशी चित्रपटानं 5 कोटी रुपये कमावलेत.

दरम्यान, अजय देवगण व्यतिरिक्त Raid 2 मध्ये वाणी कपूर, रितेश देशमुख, सौरभ शुक्ला, रजत कपूर, अमित सियाल हे कलाकार आहेत. अभिनेत्री तमन्ना भाटियानं चित्रपटात एक आयटम सॉन्ग केलंय. हे आयटम सॉन्ग चर्चेत राहिलं. हा चित्रपट राज कुमार गुप्ता यांनी दिग्दर्शित केलेला. हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रेड’चा सिक्वेल आहे. ‘रेड 2’ देखील राज कुमार गुप्ता यांनी बनवला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Maharashtra Weather Update: राज्यात अवकाळी पावसाचे ढग कायम; पुढील चार दिवस तीव्र सतर्कतेचा इशारा

आमच्या 26 महिलांचा सिंदूर पुसला, आमची माणसं मेली; डोनाल्ड ट्रम्प यांचा संबंध काय? संजय राऊतांचा संतप्त सवाल

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Maharashtra HSC Exam Result 2026: बारावीचा निकाल मोबाईलवर कसा पाहाल? काय SMS टाईप कराल, कोणत्या नंबरवर पाठवाल?

Maharashtra Vidhan Parishad Election 2026 All Candidate List: 10 जागा, 10 उमेदवार…भाजपपासून, शिवसेना, राष्ट्रवादीपर्यंत…, विधान परिषदेच्या उमेदवारांची संपूर्ण यादी!

मुंबई पायधोनी प्रकरण: बिर्याणी की कलिंगड? तज्ज्ञांनी सांगितले फूड पॉइझनिंगचे खरे कारण

अन् पोपट ठरला वन्यप्राणी… देशातील असा खटला ज्यामुळे सर्वांनी खाजवले डोके, शेतकरी तब्बल 10 वर्ष लढला; काय घडलं असं?

अजितदादांच्या अपघाताच्या दिवशी विमान मालकाच्या खात्यात 9 कोटी, दुसऱ्या दिवशी त्याहून मोठी… रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ

Todays Gold Rate: सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! सोन्याचे भाव चांगलेच घसरले, 10 ग्रॅमसाठी…