टॉप हेडलाईन्स | 19 एप्रिल 2025 | शनिवार

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

 

  1. 19 वर्षांनी पुन्हा एकत्र येऊ शकतात राज-उद्धव: राज ठाकरे म्हणाले- मतभेद छोटे, महाराष्ट्र मोठा, उद्धव म्हणाले- माझ्याकडून संघर्ष नाही

  2. घुमुदे तुतारी तुतारी…! आणखी एका कारखान्याच्या निवडणुकीत शरद पवारांच्या नेत्याचा धमाका,

    करमाळ्यातील कारखान्याच्या निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते नारायण पाटील यांनी मोठा विजय मिळवलाय.

  3. राजकारणात आणि खेळात कधी काय होईल हे सांगता येत नाही, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चांवर मंत्री भरत गोगावलेंची प्रतिक्रिया

  4. मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ येतेय, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर मोठी ताकद निर्माण होईल, छगन भुजबळांचं वक्तव्य

  5. काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांची पक्षाला सोडचिठ्ठी, भाजपमध्ये करणार प्रवेश, राज्यात काँग्रेसला मोठा धक्का

  6. फडणवीसांना सांगतो, घाटकोपरमध्ये आधी मराठी सक्ती करा, हिंदीची सक्ती कराल, तर उखडून फेकू, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

  7. शरीरासाठी दोन तास व्यायाम आणि मनासाठी सहा तास झोप राखून ठेवा, केंद्रीय मंत्री अमित शाहांनी सांगितला फिटनेस मंत्रा

  8. राज ठाकरे यांनी ‘मन की बात सांगितली’; मन मोकळे केले: युतीसाठी संजय राऊत ‘सकारात्मक’; ‘आम्ही करंटेपणा करणार नाही’

  9. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात मोठी कारवाई: डॉ. घैसास यांच्यावर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल; दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला सूट

  10. उद्धव ठाकरेंचेही राज ठाकरेंना टाळी देण्याचे संकेत: ‘महाराष्ट्र हितासाठी किरकोळ वाद बाजूला ठेवण्याची माझीही तयारी’ असल्याचे केले स्पष्ट

  11. तुम्ही आम्हाला वाईट ठरवून एकत्र येऊ शकत नाही: मनसे नेते संदीप देशपांडे यांची उद्धव ठाकरे यांच्या सशर्त प्रस्तावावर रोखठोक भूमिका

  12. राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र आले तर चांगलेच: ठाकरेंच्या नेत्यानेही केले स्वागत; ‘राज्याच्या हितासाठी मराठी माणूस एकत्र येणे आवश्यक’

  13. जोस बटलरच्या 97 धावांमुळे गुजरात विजयी: दिल्लीचा 7 विकेट्सने पराभव, प्रसिद्ध कृष्णाने 4 विकेट्स घेतल्या

  14. आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम, सर्वात कमी डावांमध्ये पूर्ण केल्या 1000 धावा

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon