टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Electricity Bill: महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना मोठा झटका; दरकपातीला स्थगिती, ८५० चे वीजबिल १००० रू. राहणार

Electricity Bill: वक्फ सुधारणा विधेयक आणि अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या टॅरिफच्या निर्णयादरम्यान महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना मोठा झटका बसल्याचे बोललं जात आहे.

Electricity Bill: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (MSEB) लिमिटेडच्या विनंतीनुसार महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (MERC) 28 मार्च 2025 रोजी जाहीर केलेल्या वीज दर आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. हा आदेश 1 एप्रिल 2025 पासून लागू होणार होता, परंतु त्यामध्ये काही स्पष्ट चुका असल्याचे महावितरणने निदर्शनास आणले आहे. त्यामुळे जोपर्यंत याचिका निकाली निघणार नाही जुनेच दर लागू होणार, अशात ग्राहकांना दिलासा मिळणार नाही. त्यामुळे वक्फ सुधारणा विधेयक आणि अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या टॅरिफच्या निर्णयादरम्यान महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना मोठा झटका बसल्याचे बोललं जात आहे.

वीज दर जैसे थे राहणार, जुनेच दर लागू राहणार-

महावितरणच्या वकिलांनी सांगितले की, या वीज दर आदेशातील चुका आणि विसंगती या वर्ष 2025-26 ते 2029-30 या पाच वर्षांच्या नियामक कालावधीतील (Control Period) वीज दराच्या मूळ स्वरूपावर परिणाम करत आहेत. तसेच, हा दर लागू केल्यास विविध प्रकारच्या ग्राहकांना आणि वीज वितरण क्षेत्रातील इतर संबंधित घटकांना मोठे आणि अपरिवर्तनीय नुकसान होऊ शकते. त्यामुळे या आदेशावर तातडीने स्थगिती द्यावी अशी मागणी महावितरणने केली आहे. म्हणजे 850 रुपये होणारे वीजबिल 1000 रुपयेच राहणार आहे.

जुना दरच लागू राहणार-

महावितरणच्या वकिलांनी यासंदर्भात सविस्तर पुनरावलोकन याचिका एप्रिल 2025 च्या अखेरीस सादर केली जाईल, असे सांगितले. या पार्श्वभूमीवर आयोगाने 28 मार्च 2025 रोजी जाहीर केलेल्या नवीन वीज दर आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. तसेच, महावितरणची पुनरावलोकन याचिका दाखल होईपर्यंत 31 मार्च 2023 रोजी जाहीर झालेला आणि 2024-25 या आर्थिक वर्षासाठी लागू असलेला जुना दरच लागू राहील, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, राज्यात 1 एप्रिलपासून लागू होणाऱ्या नव्या दरासंदर्भात महावितरणकडून याचिका दाखल झाली होती. मात्र, महावितरणकडून पुनरावलोकन याचिका दाखल करेपर्यंत आता स्थगिती देण्यात आली आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटाला पुनरावलोकन याचिका महावितरण दाखल करणार आहे. नियामक आयोगानं नफा दाखवत महावितरणच्या सर्वच गटातील ग्राहकांना दिलासा दिला होता. मात्र, महावितरणकडून तोटा होत असल्याचं सांगण्यात येत आहे.

संबंधित बातमी:

Team India Schedule 2025: बीसीसीआयने जाहीर केले टीम इंडियाचे वेळापत्रक; दोन तगडे संघ भारताच्या दौऱ्यावर येणार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

टाटासाठी सोन्याची अंडी देणाऱ्या दोन SUV! विक्रीचा महाविक्रम करत गाजवलं मार्केट

केंद्राचा डिझेलबाबत मोठा निर्णय! 36 रुपयांनी टॅक्स वाढवला, नवीन किंमत किती?

धक्कादायक! कराडमध्ये सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडा, सिग्नलमध्ये बिघाड करुन प्रवाशांचे मोबाईल, सोने लुटले, पोलिसांकडू तपास सुरु

Mathura Boat Accident VIDEO : एका क्षणी ओठी भजनं, पुढच्याच क्षणी किंकाळ्या! मथुरा बोट दुर्घटनाग्रस्तांचा शेवटचा व्हिडिओ समोर

‘अहो, मौलना पवार जेव्हा तुम्ही जाळीदार टोपी..’ भाजप नेत्याचं शरद पवारांबद्दल धक्कादायक वक्तव्य VIDEO

Video: पीएम मोदी अन् राहुल गांधी निवडणुकीच्या धामधुमीत अचानक समोरासमोर येताच काय काय घडलं?