Sunita Williams : 18 हजार फूट उंचीवर पॅराशूट खुली होणार, समुद्रात लँडिंग, सुनिता विलियम्सचा पृथ्वीच्या दिशेनं प्रवास सुरु

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Sunita Williams : अंतराळवीर सुनिता विलियम्स  आणि बुच विल्मर जून 2024 पासून अमेरिकेच्या अवकाश संशोधन केंद्रत अडकून पडले होते.

न्यूयॉर्क : अमेरिकन अंतराळवीर सुनिता विलियम्स आणि बुच विल्मर यांना घेऊन एलन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीचं स्पेसक्राफ्ट ड्रॅगनचा पृथ्वीकडे प्रवास सुरु झाला आहे. आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रापासून स्पेसक्राफ्ट अनडॉक झालं आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार बुधवारी पहाटे  साडे तीन वाजता ते पृथ्वीवर पोहोचेल. सुनिता विलियम्स, बुच विल्मर, निग हेग आणि अलेक्झांडर  गोर्बुनोव देखील परत येत आहेत.

सुनिता विलियम्स  आणि बुच विल्मर जून महिन्यापासून अंतराळात अडकले होते. नासा आणि आणि स्पेसएक्स कडून प्रयत्न करत त्यांना परत आणलं जात आहे.  त्यांच्यासोबत निग हेग आणि अलेक्झांडर गोर्बुनोव देखील परत येणार आहेत. नासानं सुनिता विलियम्स यांच्या परतीच्या प्रवासाचं वेळापत्रक जारी केलं आहे. वातावरणातील बदलामुळं यामध्ये बदल होऊ शकतो. साधारणपणे हा प्रवास 17 तासांचा असेल.

आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्र ते पृथ्वीचा प्रवास कसा असेल?

सुनिता विलियम्स यांना घेऊन स्पेसएक्सचं ड्रॅगन स्पेसक्राफ्ट आज सकाळी 10.35  वाजता अनडॉकिंग सुरु झालं आहे. अनडॉकिंगची प्रक्रिया ऑटोमेटिकपणे पार पडली.

1. स्पेसएक्सच्या ड्रॅगन स्पेसक्राफ्टमध्ये दाखल होण्यापूर्वी अंतराळवीरांनी प्रेशर सूट परिधान केले. त्यानंतर हॅच बंद करण्यात आला. त्यानंतर लिकेजची पडताळणी झाली.

2. दुसऱ्या टप्प्यात स्पेसएक्स ड्रॅगन स्पेसक्राफ्ट अनडॉकिंग करण्यात आलं. अनॉकिंगची प्रक्रिया काही टप्प्यांमध्ये पार पडली. यामध्ये सुरक्षा चाचणी, त्यापूर्वी स्पेसक्राफ्टमधील लाइफ सपोर्ट सिस्टीम, कम्युनिकेशन आणि थ्रस्टर सिस्टीमची कार्यपद्धती तपासली जाते.  दुसऱ्या टप्प्यात स्पेसक्राफ्टचं लॉक काढण्यात आलं.  स्पेसक्राफ्ट आणि आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनला जोडणाऱ्या गोष्टी खुल्या केल्या जातात. तिसऱ्या चरणात अनडॉकिंग  सिस्टिम खुली झाल्यानंतर थ्रस्टर स्पेसक्राफ्ट आयएसएसपासून वेगळं करण्यात आलं. थ्रस्टरकडून स्पेसक्राफ्टचं स्पीड आणि दिशादर्शन नियंत्रित केलं जातं.  चौथ्या टप्प्यात अनडॉकिंग करण्यात आल्यानंतर स्पेसक्राफ्ट नियंत्रित केलं गेलं. यानंतर स्पेसक्राफ्ट पूर्णपणे आयएसएसपासून वेगळं होऊन पृथ्वीच्या दिशेनं रवाना झालं.

डीऑर्बिट बर्न : या दरम्यान स्पेसक्राफ्टचं डीऑर्बिट बर्न सुरु होईल. याचं बर्निंग बुधवार 2.41 वाजेपर्यंत सुरु राहील. यानुसार इंजिन फायर केलं जाईल. यामुळं स्पेसक्राफ्ट पृथ्वीच्या दिशेनं पोहोचेल.

धरतीवर वायूमंडळात प्रवेश : स्पेसक्राफ्टचं एअरक्राफ्ट 27000 किलोमीटर प्रतितास वेगानं पृथ्वीच्या दिशेनं वायूमंडळात प्रवेश करेल.

पॅराशूट खुली होणार : पृथ्वीपासून 18 हजार फूट ऊंच अंतरावर सर्वप्रथम दोन ड्रॅगन पॅराशूट ओपन होतील. त्यानंतर 6000 फूट ऊंचीवर मुख्य पॅराशूट खुले होईल.

स्प्लॅशडाऊन  : नासाच्या माहितीनुसार स्प्लॅशडाऊन किंवा अंतराळवीरांचं लँडिंग समुद्र किनाऱ्यावरील फ्लोरिडाच्या तटावर होईल. वातावरणीय अडचण आली नाही तर लँडिंग 3.27 वाजता होईल.

इतर बातम्या : 

http://*Maharashtra CET Exam 2025 Dates: महाराष्ट्रात CET परीक्षांचं कसं असेल वेळापत्रक? १९ मार्च ते ३ मे या कालावधीत होणार सर्व परीक्षा!* https://solapurviralnews.com/maharashtra-cet-exam-2025-dates-what-will-be-the-schedule-of-cet-exams-in-maharashtra-all-exams-will-be-held-from-march-19-to-may-3/

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon