businesseducationtop news

गॅस सिलिंडर ते क्रेडिट कार्ड! 1 नोव्हेंबरपासून अनेक नियमांत बदल, तुमच्या खिशावर पडणार थेट परिणाम; वाचा…

नोव्हेंबर महिना चालू व्हायला आता अवघे काही तास शिल्लक आहेत. नव्या महिन्याच्या सुरुवातीला पहिल्या तारखेपासूनच अनेक महत्त्वाच्या नियमांत बदल होणार आहे. या बदललेल्या नियांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर पडणार आहे. नोव्हेंबर महिन्यापासून ट्रेन तिकिटापासून ते क्रेडिट कार्डच्या नियमांपर्यंत अनेक नियमांत बदल होणार आहे. 

रेल्वेच्या तिकिटासाठी नवा नियम काय? 

अॅडव्हान्स तिकीट बुकिंगच्या नियमात येत्या 1 नोव्हेंबरपासून बदल होणार आहेत. रेल्वे प्रशासनाने तसा निर्णय घेतला आहे. याआधी प्रवासी एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर 120 दिवस अगोदरच प्रवासाचं तिकीट अॅडव्हानस बुकिंगच्या माध्यमातून आरक्षित करू शकायचे. आता मात्र हा कालावधी 60 दिवसांवर आणण्यात आला आहे. म्हणजेच येत्या 1 नोव्हेंबरपासून कोणत्याही प्रवासासाठी 60 दिवसाच्यां अगोदर तिकीट आरक्षित करता येणार आहे. 

मनी ट्रान्सफरचा नियम

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) डोमॅस्टिक मनी ट्रान्सफरच्या नियमांत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. हे नवे नियम येत्या 1 नोव्हेंबर 2024 रोजीपासून लागू होतील. फसवणुकीपासून ग्राहकांचे रक्षण व्हावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 

 LPG सिलिंडरचे दर बदलणार 

प्रत्येक महिन्याच्या एका तारखेला तेल कंपन्या गॅस सिलिंडरच्या दरात बदल करतात. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलंडरचा नवा दर लागू होण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या तोंडावर गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

 

ATF-CNG चा दर 

फक्त गॅस सिलिंडरच नव्हे तर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला ATF-CNG चाही नवा भाव जाहीर केला जातो.

 

SBI कार्डसाठी नवा नियम 

येत्या 1 नोव्हेंबरपासून क्रेडिट कार्ड युजर्ससाठी नवे नियम लागू होणार आहेत. तुमचे क्रेडिट कार्डच्या माध्यमातून 50 हजारांपेक्षा कमी युटिलिटी बिल असेल, तर तुम्हाला कोणताही अतिरिक्त चार्ज लागणार नाही. युटिलिटी बिल मात्र 50 हजारांपेक्षा अधिक असेल तर तुम्हाला एक टक्के अतिरिक्त चार्ज द्यावा लागेल.  

म्युच्यूअल फंडासाठी नवा नियम 

नोव्हेंबर महिन्यापासून म्युच्यूअल फंडाच्या इन्ससाईडर ट्रेडिंगच्या नियमांत बदल केला जाणार आहे. 

Related Articles

Back to top button