सोलापूर, 11 मार्च (हिं.स.)।जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून येत्या दोन-तीन दिवसांत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक कार्यक्रमाचा प्रस्ताव राज्य निवडणूक प्राधिकरणाकडे पाठविण्यात येणार आहे. निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशानुसार मार्च महिन्यात निवडणूक कार्यक्रम आणि एप्रिल महिन्यात निवडणुका घेणार असल्याने पुढील महिन्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पार पडण्याची शक्यता आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने सोलापूर बाजार समितीच्या निवडणुका आहे त्या स्थितीत घेण्याच्या आदेश जिल्हा उपनिबंधकांना दिले होते. त्यानुसार जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समिती निवडणुकीचा कार्यक्रम तयार केला आहे. त्याचा प्रस्ताव राज्य निवडणूक प्राधिकरणाकडे येत्या दोन-तीन दिवसांत पाठविण्यात येणार आहे.