सोलापूर, 7 मार्च (हिं.स.)। स्मार्ट सिटीत कचरा व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष झाले आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा कोंडाळे साचू नये तसेच नागरिकांना कचरा टाकणे सुलभ व्हावे अशी दुहेरी सोय साधत शहरात ठिकठिकाणी तीन हजार डस्टबीन लावण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.
शहरातील कचरा व्यवस्थापनासाठी घनकचरा विभाग आता पुढचे पाऊल टाकत आहे. शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छता, देखभाल व दुरुस्ती, सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी आकांक्षी योजनेतून उभारण्यात येणारे स्वच्छतागृह आणि शहरात वर्दळीच्या ठिकाणी नागरिकांना विविध स्वरूपाचा कचरा टाकण्यासाठी सोयीच्या ठिकाणी तीन हजार डस्टबीन ठेवण्यात येणार आहेत. यापूर्वी शहरात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत तब्बल २५० ओले व कचरा असे विलगीकरण करून डस्टबीन ठेवण्यात आले होते. परंतु आता अनेक ठिकाणी याचे सांगाडेच शिल्लक राहिले आहेत.
हे सुद्धा वाचा
वायुसेनेचे जग्वार लढाऊ विमान कोसळले
राज्य सरकार हे औरंगजेबाच्या विचाराने चालणारे सरकार – हर्षवर्धन सपकाळ