सोलापूर, 7 मार्च (हिं.स.)।
बांगलादेशी घुसखोर एका ठेकेदारामार्फत भारतात तर दुसऱ्या एका ठेकेदारामार्फत सोलापुरात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्या बांग्लादेशींनी पोलिसांना तसे सांगितल्याचे समजते. तो ठेकेदार कोण आहेत, या घुसखोर कामगारांना बनावट आधारकार्ड कसे मिळाले याचा तपास सध्या सुरू आहे.
भारत- बांगलादेश सीमेवरील मुलकी (नोंदणी) अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगीशिवाय अवैध मार्गाने घुसखोरी करून भारतात आलेल्या १२ जणांकडे तमिळनाडू, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, अशा वेगवेगळ्या राज्यात वास्तव्यास असल्यासंदर्भातील बनावट आधारकार्ड आहेत. ते १२ जण टप्प्याटप्प्याने सहा महिन्यांपासून सोलापुरातील अक्कलकोट रोड एमआयडीसीमध्ये कामासाठी आले. एमआयडीसी पोलिसांनी त्यांना जेरबंद केले असून न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे.