मुंबई , 4 मार्च (हिं.स.)।अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री कृती खरबंदा यांची मुख्य भूमिका असलेला ‘शादी में जरूर आना’ हा चित्रपट पुन्हा एकदा रिलीज होणार आहे. मागील काही दिवसांपासून अनेक चित्रपट पुन्हा एकदा रिलीज झाले आहे. यातच आता ‘शादी में जरूर आना’ हा चित्रपटही प्रेक्षकांना सिनेमागृहात पुन्हा पाहता येणार आहे.
तरण आदर्श यांनी एक्स हँडलवर एक पोस्ट शेअर करून या चित्रपटाच्या पुन्हा प्रदर्शनाची माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले, ‘राष्ट्रीय पुरस्कार विजेता राजकुमार राव आणि कृती खरबंदाचा ‘शादी में जरूर आना’ ७ मार्च २०२५ रोजी थिएटरमध्ये येणार आहे.’ हा चित्रपट २०१७ मध्ये प्रदर्शित झाला होता.
२०१६ मध्ये प्रदर्शित झालेला ‘सनम तेरी कसम’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी पुन्हा प्रदर्शित झाला आहे. हर्षवर्धन राणे आणि मावरा होकेन या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाने पहिल्यापेक्षा दुसऱ्यांदा बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली. आता राजकुमार रावचा ‘शादी में जरूर आना’ हा चित्रपटाला देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळणार का? हे पहावे लागणार आहे.