Chhaava First Weekend Collection: बॉक्स ऑफिसवर ‘छावा’चं तुफान; 72 तासांत 10 फिल्म्सचे रेकॉर्ड्स चक्काचूर

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Chhaava Weekend Box Office Collection: विक्की कौशलचा (Vicky Kaushal) ‘छावा’ (Chhaava Movie) प्रदर्शित होऊन फक्त 3 दिवस झालेत आणि या चित्रपटानं विक्रमांचा डोंगरच रचायला सुरुवात केलीय. कदाचित स्वतः विक्की कौशलनंही याची कल्पना केली नसेल, असे एकापेक्षा एक भारी विक्रम ‘छावा’नं रचले आहेत. खरं तर, ‘छावा’नं फक्त 3 दिवसांत 100 कोटींचाच टप्पा ओलांडला नाही तर, विक्की कौशलच्याच एकूण 11 चित्रपटांपैकी 10 चित्रपटांचा बॉक्स ऑफिस रेकॉर्डही मोडला आहे.

‘छावा’नं विक्कीच्याच 11 चित्रपटांचा रेकॉर्ड मोडला

‘छावा’च्या अधिकृत दोन दिवसांच्या आकडेवारीनुसार, चित्रपटानं पहिल्या दिवशी अनुक्रमे 33.1 कोटी आणि पहिल्या दिवशी 39.30 कोटी रुपये कमावले, अशा प्रकारे दोन दिवसांत एकूण 72.40 कोटी रुपये कमावले. सॅक्निल्कच्या मते, चित्रपटानं तिसऱ्या दिवशी 49.50 कोटी रुपये कमावून एकूण 121.9 कोटी रुपये कमावले आहेत.

यासह, या चित्रपटानं विक्की कौशलच्या कारकिर्दीतील सर्व 10 चित्रपटांच्या लाईफटाईम कलेक्शनलाही मागे टाकलं आहे. बॉलीवुड हंगामानं दिलेल्या वृत्तानुसार, फक्त 3 दिवसांत ‘उरी – द सर्जिकल स्ट्राइक’ (245.36 कोटी रुपये) वगळता इतर सर्व चित्रपटांचा विक्रम ‘छावा’नं मोडला आहे.

विक्की कौशलच्या फिल्म्स लाईफटाईम कमाई (कोटींमध्ये)
मसान 3.65
जुबान 0.46
रमन राघव 2.0 7
मनमर्जियां 27.09
भूत पार्ट वन- द हॉन्टेड शिप 31.97
द ग्रेट इंडियन फैमिली 5.65
जरा हटके जरा बचके 88
सॅम बहादूर 92.98
बॅड न्यूज 66.28
राजी 123.84

 

छावा’ विक्की कौशलच्या कारकिर्दीतल सर्वात मोठा चित्रपट 

आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, पहिल्या आठवड्याच्या शेवटी ‘छावा’ची कमाई विक्की कौशलच्या कारकिर्दीतील एकूण 6 फ्लॉप चित्रपटांच्या कमाईपेक्षा जास्त झाली आहे. याशिवाय, ‘छावा’ विक्की कौशलच्या आजवरच्या फिल्म्सपैकी सर्वात मोठी ओपनिंग फिल्म ठरला आहे. त्यासोबतच सर्वात मोठा वीकेंड ओपनर चित्रपट बनला आहे.

फिल्म उरी- द सर्जिकल स्ट्राईकच्या लाईफटाईम कलेक्शनच्या मागे आहे. चित्रपटाच्या कमाईचा वेग पाहता ‘छावा’ तुफान कमाई करणार यात काही शंका नाही.

Chhaava First Weekend Collection: बॉक्स ऑफिसवर ‘छावा’चं तुफान; 72 तासांत 10 फिल्म्सचे रेकॉर्ड्स चक्काचूर

Uddhav Thackeray: ऑपरेशन टायगरची चर्चा, डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरे ॲक्शन मोडमध्ये

अमेरिकेतून आणखी ११२ अनिवासी भारतीयांना घेऊन तिसरे विमान दाखल

विधानसभा जिंकल्यानंतर भाजपची ‘शत-प्रतिशत’ची तयारी; महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत

 

 

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon