अमृतसर , 17 फेब्रुवारी (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या नागरिकांवर सरकारकडून कारवाई केली जात आहे.या कारवाई नुसार अमेरिकेमधून आता 112 अनिवासी भारतीयांना घेऊन तिसरे विमान अमृतसर विमानतळावर रविवारी रात्री उशीरा पोहचले.
अमेरिकेमधून भारतात आलेल्या 112 अनिवासी भारतीयांमध्ये पंजाब – 31, हरियाणा -44, गुजरात – 33 जणांसह उर्वरीत अन्य राज्यांमधील आहेत. हे विमान रविवारी(१६ फेब्रुवारी) रात्री उशीरा अमृतसर विमानतळावर पोहचले. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने बेकायदेशीर स्थलांतरावर कारवाईचा एक भाग म्हणून हद्दपार केलेली ही अशा भारतीयांची तिसरी तुकडी आहे. माहितीनुसार, हे विमान १५७ बेकायदेशीर स्थलांतरितांसह भारतात येणार आहे, परंतु अद्ययावत यादीत ही संख्या ११२ इतकी होती.
याआधी शनिवारी( १५ फेब्रुवारी )रात्री उशीरा अमेरिकेतून 116 निर्वासितांना घेऊन एक अमेरिकन सैन्य विमान अमृतसर एअरपोर्टवर पोहचले होते. शनिवारी रात्री जवळपास 11.30 वाजता विमानतळावर उतरलेल्या सी-17 विमानाच्या माध्यमातून निर्वासित भारतीयांच्या दुसऱ्या ग्रुपला भारतात आणले गेले.यामध्ये 65 जण पंजाबचे, हरिणातील 33जण, आठ जण गुजरातमधील तर प्रत्येकी दोन जण उत्तर प्रदेश, गोवा, महाराष्ट्र आणि रास्थानातील होते. याशिवाय हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमधील प्रत्येक एक जणाचा समावेश होता. माहितीनुसार, दुसऱ्या समूहात बहुतांश जणांचे वय 18 ते 30 यादरम्यान होते.
५ फेब्रुवारी रोजी पहिल्यांदा १०४ बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना घेऊन जाणारे अमेरिकन लष्करी विमान अमृतसर विमानतळावर उतरले. यापैकी प्रत्येकी ३३ जण हरियाणा आणि गुजरातमधील होते, तर ३० जण पंजाबमधील होते. परदेशातून हद्दपार केलेल्या आणि बेकायदेशीर स्थलांतरित ठरवण्यात आलेल्या भारतीय स्थलांतरितांच्या दुसऱ्या तुकडीच्या कुटुंबातील अनेकांना या गोष्टीचा धक्का बसला. त्यापैकी अनेकांनी असा दावा केला की आपल्या कुटुंबातील सदस्याला अमेरिकेत पाठवण्यासाठी जे पैसे उभे करायचे होते, त्यासाठी त्यांनी त्यांची शेती आणि गुरेढोरे गहाण ठेवली होती. याशिवाय शनिवारी रात्री उशीरा भारतात पोहचलेल्या अनिवासी भारतीयांनी अमेरिकेपर्यंतच्या आपल्या प्रवासातील त्यांना आलेल्या अडचणी देखील सांगितल्या.