maharashtra

पहिल्यांदाच भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिंदे गटाची महायुती

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले.  तरी ही आघाडी कायम ठेवण्याचा निर्णय तिन्ही पक्षांनी घेतला. राज्यातील गावपातळीपासून ते देशपातळीपर्यंतच्या निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णयही झाला. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात एक अनोखीच महायुती उदयास आली आहे. 

उद्धव ठाकरे यांच्या गटाला एकाकी पाडून ही महायुती झाली आहे. लांजा तालुक्यात खरेदी विक्री संघाची निवडणूक होत आहे. येत्या १५ जानेवारी रोजी एकूण १७ जागांसाठी मतदान होत असून एकूण ३७ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. ही एक छोटी निवडणूक असली तरी ती जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जय्यत तयारी केली आहे. खरेदी विक्री संघावर आपले वर्चस्व राखण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली गणिते मांडली असून त्यानुसार रणनीती आखली जात आहे. च्या निवडणुकीत अनोखी युती झालेली पाहायला मिळत आहे.
या निवडणुकीत भाजप, शिंदे गट विरुद्ध शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असा सामना होईल, अशी अपेक्षा होती. भाजप युती विरुद्ध महाविकास आघाडी असे चित्र दिसेल, असे सर्वांनाच वाटत होते. मात्र, अनोख्या महायुतीमुळे केवळ लांज्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील जनतेला आश्चर्याचा धक्का बसला आहे. 
लांज्यात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिंदे गट एकत्र आले आहेत. तर ठाकरे यांचा गट स्वबळावर निवडणूक लढणार आहे. ठाकरे गटाविरोधात सर्वपक्षीय पॅनल एकत्र आले आहे. या पॅनलला सहकार पॅनल असे नाव देण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button