india world
देशात पुन्हा नोटाबंदी?; केंद्र सरकारने संसदेत दिली मोठी अपडेट
देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यापासून या सरकारने अनेक बेधडक निर्णय घेतले आहेत. नोटाबंदी हा त्यातील मोठा निर्णय होता. अशातच संसदेत दुसऱ्या नोटाबंदीचा मुद्दा उपस्थित झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. मोदी सरकारने यावर एक खुलासा केला आहे.देशाच्या अर्थव्यवस्थेत रोखीचे व्यवहार पुन्हा वाढले आहेत व बाजारात रोकडही वाढली आहे. त्यामुळे सरकार पुन्हा एकदा नोटाबंदीचा निर्णय घेण्याच्या विचारात आहे का, असा प्रश्न काँग्रेसचे राज्यसभा सदस्य राजीव शुक्ला यांनी उपस्थित केला.
नोटबंदीसारखा निर्णय घेण्याचा केंद्र सरकारचा सध्या कुठलाही विचार नाही. कमीत कमी रोकड असलेल्या अर्थव्यवस्थेच्या दिशेने सरकार काम करत आहे. डिजिटल पेमेंट यंत्रणा अधिक मजबूत करण्याचं काम सुरू आहे, असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट केले.