टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

ब्रेकिंग! १० ते १२ आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात

Follow Us:
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत प्रसार माध्यमांशी बोलताना एक मोठं वक्तव्य केलं आहे.
१० ते १२ आमदार आमच्या संपर्कात आहेत. सरकार पाडण्याच्या किंवा निवडणुका लागण्याच्या गोष्टी काही लोकांनी केल्या असल्या तरी १७० हा आमचा बहुमताचा आकडा आहे.
१० ते १२ आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे बहुमताचा आकडा १८० ते १८२ पर्यंत जाऊ शकतो, असा दावा सामंत यांनी केला आहे. सामंत यांनी केलेल्या या दाव्यामुळे ठाकरे गटाला पुन्हा खिंडार पडणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. आपल्या वक्तव्यामध्ये उदय सामंत यांनी एका विशिष्ट पक्षाचा उल्लेख जरी केला नसला, तरी त्यांचा रोख ठाकरे गटाच्याच दिशेने असल्याचे बोलले जात आहे.
WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा