नोकरी
GOOD NEWS! बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकर भरती

बेरोजगार तरुण तरुणींना दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. कारण बँक ऑफ महाराष्ट्र येथे काही जागांची भरती होणार आहे. बारावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना ही चांगली संधी आहे.
बँक ऑफ महाराष्ट्र येथे शिकाऊ उमेदवार या पदांसाठी ही भरती होणार आहे. संबंधित उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. त्यासाठीची अंतिम मुदत 23 डिसेंबर आहे. 314 पदांसाठी ही भरती होणार आहे.
यासाठी पात्र उमेदवाराने बारावीपर्यंतचे शिक्षण घेणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांनी प्रशिक्षण संस्थेतून अथवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेले असावे. संबंधित पदाचा किमान अनुभव असणे गरजेचे आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी पुढील लिंकवर क्लिक करावे.
https://ibpsonline.ibps.in/bomasep22/