crime

…तर आज श्रद्धा जिवंत असती

  • वसईच्या तुळींज आणि मणिपूर पोलिसांनी असहकार्य केले. तसं झालं नसतं तर श्रद्धा वालकरचा जीव वाचला असता, असा आरोप श्रद्धाचे वडिल विकास वालकर यांनी केला. आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला. यावेळी भाजप नेते किरिट सोमय्यासुद्धा उपस्थित होते. या पत्रकार परिषदेआधी विकास यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.
    श्रद्धाची दिल्लीत निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती. 
  • तिचा प्रियकर आफताब पुनावालाने मे महिन्यात तिची हत्या करून तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले होते. हे तुकडे त्याने जवळच्या जंगलात फेकून दिले आहेत. हे प्रकरण नोव्हेंबर महिन्यात उजेडात आल्यानंतर एकच खळबळ माजली. दरम्यान, आतापर्यंत माध्यमांपासून लांब राहिलेल्या श्रद्धाच्या नातेवाईकांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला.
    तुळींज पोलीस ठाणे आणि मणिपूर पोलीस ठाण्याच्या असहकार्याच्या भूमिकेमुळे मला त्रास सहन करावा लागला. त्याबद्दल चौकशी व्हावी. जर तसं झालं नसतं तर माझी मुलगी जिवंत असती. किंवा काही पुरावे मिळण्यास मदत झाली नसती. मला माझ्या मुलीसाठी न्याय मिळावा यासाठी सहकार्याची अपेक्षा आहे, असं विकास म्हणाले.
    माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. त्यामुळे, आफताबने श्रद्धाची क्रुरपणे हत्या केली असून त्याला लवकरात लवकर शिक्षा व्हावी. या कटात सहभागी असलेल्या अफताबच्या कुटुंबीयांनाही जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे. कटात सहभागी असणाऱ्या इतर लोकांवरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी विकास यांनी  केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button