political
ब्रेकिंग! चंद्रकांत पाटील होणार गुजरातचे नवे मुख्यमंत्री?
गुजरातमध्ये भाजप १५६ जागांच्या पुढे आहे. गुजरातमध्ये भाजप सरकार स्थापन करणार, हे आता निश्चत झाले आहे. मात्र नवीन मुख्यमंत्री कोण असणार यादेखील चांगल्या चर्चा रंगू लागले आहे.
चंद्रकांत पाटील उर्फ सी.आर. पाटील हे गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांचे पूर्ण नाव चंद्रकांत रघुनाथ पाटील असे आहे ते मुळचे महाराष्ट्रातले आहे. गुजरातमध्ये भाजपचे वरिष्ठ नेते मुख्यमंत्रीपदाची संधी कुणाला देणार? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. यामध्ये पाटील यांचंही नावाची चर्चा जोर धरत आहे.
निवडणूक आयोगाने गुजरात निवडणूक जाहीर करताच पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी गुजरातमध्ये १५० जागांवर विजय मिळवण्याचे टार्गेट कार्यकर्त्यांना दिले होते. भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत दीडशेहून अधिक जागा जिंकून विक्रम करण्याची इच्छा मोदींनी व्यक्त केली होती आणि याची जबाबदारी होती गुजरात प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील.
सीआर पाटील हे मूळचे महाराष्ट्रातील पिंपरीतील आहेत. गुजरात निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी, प्रचार यंत्रणा, उमेदवारी वाटप सर्व काही पाटील यांच्या नेतृत्वात पार पडले. सीआर पाटील यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या जवळचे समजले जाते. सीआर पाटील हे सध्या गुजरात भाजपचे अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म १६ मार्च १९५५ रोजी महाराष्ट्रातील पिंपरी येथे झाला.
पाटील हे नवसारीचे खासदारही आहेत. सीआर पाटील अत्याधुनिक तंत्रज्ञानाबाबत अपडेट राहतात. त्यांनी जनतेला जोडण्यासाठी नवनवीन पद्धती अवलंबल्या जातात. या निवडणुकीत प्रचारातही रोबोटचा वापर करण्यात आला. पाटील हे सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतात.