sports
वनडे वर्ल्डकप लवकरच : त्याआधी भारत खेळणार १८ वनडे सामने
2023 चा एकदिवसीय विश्वचषक राऊंड रॉबिन स्वरूपात खेळवला जाईल. म्हणजेच २०१९ च्या विश्वचषकाप्रमाणे सर्व १० संघ एकमेकांविरुद्ध सामने खेळतील. एक संघ एकूण ९ सामने खेळणार आहे.
पुढील वर्षी वनडे वर्ल्डकप भारतात होणार आहे.
या स्पर्धेसाठी टीम इंडियाने तयारी सुरू केली आहे. पुढील वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विश्वचषक प्रस्तावित आहे. मात्र, त्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले नाही. मात्र, शिखर धवनने सांगितले आहे की, बांगलादेशविरुद्धच्या मालिकेपासून वनडे विश्वचषकाची तयारी सुरू होईल. भारताला येथून पुढे एकूण १८ एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. याशिवाय संघाला ९ टी-२० आणि ८ कसोटी सामने खेळायचे आहेत.
वनडे विश्वचषकापूर्वी नियोजित सामनेदेशांविरूद्ध सामने कधीबांगलादेश ३ वनडे , २ कसोटी डिसेंबर २०२२श्रीलंका ३ वनडे, ३ टी-20 जानेवारी २०२३न्यूझीलंड ३ वनडे, ३ टी-20 जानेवारी-फेब्रुवारी २०२३ऑस्ट्रेलिया ३ वनडे, ४ कसोटी मार्च २०२३वेस्ट इंडिज ३ वनडे, २ कसोटी, ३ टी-20 जुलै २०२३आशिया कप सामने संध्या सध्या निश्चित नाही सप्टेंबर २०२३ऑस्ट्रेलिया ३ वनडे सप्टेंबर २०२३वनडे वर्ल्डकप – ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२३