business

ब्रेकिंग! भारतातील ६० लाख जणांचा व्हॉट्सॲप डेटा चोरीला

भारतासह जगभरात सायबर गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतेय. यात हॅकर्स सतत नव्या डेक्नॉलॉजीच्या माध्यमातून नवे क्राईम करत आहेत. यात आता जगातील कोट्यावधी युजर्सचा व्हॉट्सॲप नंबर आणि खासगी डेटा चोरी करत तो ऑनलाईन विक्री केल्याची घटना समोर आली आहे. 

हॅकर्सनी जगभरातील 487 दशलक्ष व्हॉट्सॲप युजर्सचा डेटा हॅक करुन तो इंटरनेटवर विकला आहे. यातील 61.62 लाख फोन नंबर भारतीयांचे आहेत. या डेटामध्ये फोन नंबर, देशाचे नाव, एरिया कोडचा समावेश आहे.जारी करण्यात आलेल्या आकडेवारीत 84 देशांमधील नागरिकांची माहिती आहे. देशांनुसार नंबरच्या श्रेणी बनवून विकल्या जात आहेत. हॅकरने सोबतच्या मेसेजमध्ये लिहिले की, आज मी या व्हॉट्सॲप युजर्सचा डेटा बेस विकत आहे. हा 2022 चा नवीन डेटा आहे. म्हणजेच तुम्ही ते विकत घेतल्यास, तुम्हाला नवीन अॅक्टिव्ह मोबाइल युजर्स मिळतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button