india world
खुशखबर! पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात येणार?
लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी आज महत्वपूर्ण विधान केले आहे. पीओके म्हणजेच पाकव्याप्त काश्मीर परत घेण्यासाठी भारत सज्ज झालाआहे. भारतीय सेना कोणत्याही कारवाईसाठी पूर्णपणे तयार आहे. भारत सरकार जो आदेश देईल त्यासाठी आम्ही सज्ज आहोत. असे द्विवेदी म्हणाले. भारताकडून अशा हालचालींना वेग आलाय का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पाकव्याप्त काश्मीर हा भारताच्या उत्तरेकडचा भाग आहे. गिलगिट बाल्टिस्तानचा हा भाग पाकिस्तानच्या अखत्यारित येत आहे. पीओकेसाठी मागील अनेक वर्षांपासून भारत प्रयत्न करत आहे. अशातच इथे आता लष्करी कारवाई होण्याचे संकेत दिसत आहेत. ३० जानेवारी रोजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी एक विधान केले होते.
२०२४ पर्यंत पाकव्याप्त काश्मीर भारतात येण्याची शक्यता आहे, असे त्यांनी कल्याणमधील एका कार्यक्रमात सांगितले होते.
भारत आणि पाकिस्तानमध्ये कश्मीर प्रश्नावरून नेहमी वाद राहिला आहे. काश्मीरच्या मुद्द्यावरून दोन्ही देशांमध्ये कायम तणावाची स्थिती पाहायला मिळाली. अशातच आता पाकव्याप्त काश्मीरचा भाग भारतात येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.