business
पॅन आधार कार्डशी करा लिंक अन्यथा पॅन होणार बंद
आधारकार्डाशी पॅनकार्ड लिंक केले नसल्यास आता येत्या ३१ मार्च २०२३ ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. आयकर विभागाने दिलेली ही अंतिम मुदत आहे. यानंतरही जर कोणीही आधार पॅन लिंक केले नसल्यास त्याचे पॅन कार्ड रद्द करण्यात येणार आहे. गेले वर्षभर आयकर विभागाने आधारकार्डाशी पॅन लिंक करण्यासाठी अनेकदा मुदतीत वाढ केली होती. कोणत्याही आर्थिक व्यवहारांमध्ये पॅककार्ड हे अत्यंत महत्त्वाचे दस्तावेज मानले जाते. त्यामुळे हे दोन्ही कार्ड परस्परांशी लिंक करणे केंद्र सरकारने अनिवार्य केले आहे.
आयकर विवरण पत्र भरण्यासाठी तसेच इतर अनेक कारणांसाठी केंद्र सरकारने आधार कार्डशी पॅनकार्डची जोडणी करणे आवश्यक केले आहे.
पण इंटरनेट समस्या आणि कोरोनाची कारणे देत ही अंतिम मुदत पुढे ढकलण्यात आली होती. ३१ मार्च ते ३० जून २०२२ पर्यंत आधार कार्ड पॅन सोबत जोडण्यासाठी सध्या ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. ३० जून नंतर आधार आणि पॅनकार्ड लिंक करण्यासाठी नागरिकांना १००० रुपये मोजावे लागणार आहेत.