भारत जोडो कार्यक्रमात काँग्रेसची फजिती ; राष्ट्रगीता ऐवजी वाजू लागले भलतेच गाणे

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. दरम्यान वाशिम येथे झालेल्या एका कार्यक्रमात भलताच प्रकार घडला. यामुळे संपूर्ण जगभरात काँग्रेसची नाचक्की झाली आहे. हा कार्यक्रम सुरू असताना भारताच्या राष्ट्रगीता ऐवजी दुसरेच गाणे लागल्याने सारेच अचिंबित झाले.

या प्रकारावरून राहुल गांधी सध्या टीकेचे धनी बनले आहेत. एक सभा सुरू असताना राहुल गांधी यांनी राष्ट्रगीत वाजवायला सांगितले. मात्र त्यावेळी चुकून दुसरेच गाणे लागले.
चुकीचे गाणे वाजत आहे हे लक्षात आल्यानंतर राहुल यांनी संबंधित नेत्यांना रोखले आणि भारताचे राष्ट्रगीत लावायला सांगितले. मात्र मंचावर उपस्थित असलेल्या नेत्यांना ही बाब उशिरा लक्षात आली आणि अखेर ते गाणे बंद करण्यात आले. भाजपचे नेते नितेश राणे यांनी हा व्हिडिओ शेअर करून राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon