Sunday, September 8, 2024
Hometop newsब्रेकिंग! सलग दोन दिवस बँका राहणार बंद

ब्रेकिंग! सलग दोन दिवस बँका राहणार बंद

बँक कर्मचाऱ्यांनी एक दिवसीय लाक्षणिक संपाची हाक दिल्याने मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची गैरसोय होण्याची चिन्हे आहेत. या महिन्यात बँक संघटनांनी देशव्यापी बंदची हाक दिली आहे. १९ नोव्हेंबर रोजी बँक संघटना सरकारच्या धोरणांविरोधात लक्षणिक संप करणार आहे. त्यादिवशी बँकांचे कामकाज ठप्प होईल. 20 नोव्हेंबर रोजी रविवार असल्याने सलग दोन दिवस बँका बंद राहतील. 

सरकारी सुट्टया आणि राष्ट्रीय सुट्ट्या या दोन श्रेणी बँकांच्या सुट्ट्या असतात. तसेच भारतात तीन राष्ट्रीय सुट्ट्या आहेत. यावर्षी जानेवारीपासून डिसेंब पर्यंत बँकांना सुमारे शंभर पेक्षा जास्त सुट्ट्या होत्या, यामध्ये शनिवार आणि रविवारचा देखील समावेश आहे. तरीही बँक कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी संप करतात, त्यामुळे बँकेचे कामकाज ठप्प होते.
कामगार कायदे आणि खासगीकरणाला विरोध करण्यासाठी एआयबीईए या संघटनांचे देशभरातील पाच लाखावर सभासद कर्मचारी तसेचअधिकारी दोन दिवसांच्या संपात सहभागी होणार आहेत. 
महाराष्ट्र राज्यातील सात हजार शाखांतून काम करणारे जवळजवळ तीस हजार बँक कर्मचारी तसेच अधिकारी या संपात सहभागी होणार असून राज्याची बँकिंग व्यवस्था ठप्प होणार आहे. कामगार संघटनांनी पुकारलेल्या संपात कर्मचारी तसेच अधिकारी यांचा सहभाग आहे. 
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments