टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

MPSC Group C Extension : एमपीएससीच्या ‘गट-क’ पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर

On: November 28, 2026 11:36 AM
Follow Us:

MPSC Group C Prelims 2026 : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 साठी सुधारित वेळापत्रकानुसार 29 नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार असून, 30 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन परीक्षा शुल्क भरता येईल.

नवी मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 (Maharashtra Group C Services Combined Preliminary Examination 2026) साठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ दिली आहे. 25 जून 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरात क्रमांक 017/2026 तसेच त्यानंतरच्या शुद्धिपत्रकांच्या अनुषंगाने ही मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे. अर्ज भरताना येणाऱ्या अडचणी आणि कागदपत्रांची पूर्तता व समतुल्य शैक्षणिक अहर्तांच्या अनुषंगाने पात्र उमेदवार वंचित राहू नयेत, या उद्देशाने आयोगाने हा निर्णय घेतला आहे.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या 27 नोव्हेंबर 2026 रोजीच्या पत्रानुसार प्राप्त अभिप्रायानुसार समतुल्य शैक्षणिक अहर्तांच्या संदर्भात 27 नोव्हेंबर रोजी शुद्धिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार अर्ज भरण्याची मुदत वाढवण्यात (MPSC Group C Prelims) आली असून, उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

MPSC Group C Exam Revised Deadlines : अर्ज आणि शुल्क भरण्याच्या नव्या तारखा काय?

आयोगाने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 साठी सुधारित वेळापत्रक खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:

अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक : 29 नोव्हेंबर 2026 रोजी 23.59 वाजेपर्यंत

ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक : 30 नोव्हेंबर 2026 रोजी 23.59 वाजेपर्यंत

MPSC Group C Eligibility And Corrigendum : शुद्धिपत्रक आणि पात्र उमेदवारांना संधी

शासनाच्या विविध विभागांकडून प्राप्त मागणीपत्रांनुसार 25 जून 2026 रोजी जाहिरात क्रमांक 017/2026 प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर अतिरिक्त मागणीपत्रांचा समावेश करण्यासाठी 6 नोव्हेंबर 2026 रोजी शुद्धिपत्रक प्रसिद्ध करून अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक 27 नोव्हेंबर 2026 निश्चित करण्यात आला होता.

आता 27 नोव्हेंबर 2026 रोजी समतुल्य शैक्षणिक अहर्तांबाबत नवे शुद्धिपत्रक प्रसिद्ध झाल्याने, अर्ज सादर करण्यास पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना संधी मिळावी यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

ही बातमी वाचा:

अजून 7 खासदारांचा हवा पाठिंबा, सरकारने बाहेर काढला हुकमी एक्का, बहुमताचा कसा होणार जुगाड?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

अजून 7 खासदारांचा हवा पाठिंबा, सरकारने बाहेर काढला हुकमी एक्का, बहुमताचा कसा होणार जुगाड?

Jaykumar Gore on Satara District Bank Chairman Election 2026: शंभुराज देसाईंनी धक्काबुक्कीचा वचपा काढला, अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर जयकुमार गोरेंचा चेहरा पडला, शांतपणे बाहेर चालत आले अन् म्हणाले…

FASTag वापरताय? बॅलन्स कमी असल्यास टोल नाक्यावर भरावा लागेल दुप्पट टोल; प्रवासाला निघण्यापूर्वी हे नियम जाणून घ्या

Latur DCC Bank Election Result 2026: लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निकाल जाहीर; देशमुखांच्या सहकार पॅनला स्पष्ट बहुमत, पाहा विजयी उमेदवारांची यादी

Pandharpur Ambegaon Well Collapse: विहिरीच्या मोजमापासाठी उतरले, अचानक ढिगारा कोसळल्याने अडकले; 24 तासांनी 4 मजूरांचे मृतदेह सापडले, पंढरपुरातील आंबेगावातील सुन्न करणारी घटना

अखेर आतली बातमी फुटलीच? विलिनीकरणावर विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान, कुणाला मंत्रिपद…