टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

अजून 7 खासदारांचा हवा पाठिंबा, सरकारने बाहेर काढला हुकमी एक्का, बहुमताचा कसा होणार जुगाड?

On: November 28, 2026 11:20 AM
Follow Us:

Delimitation Bill 2026: 30 नोव्हेंबरपासून संसदेचे विशेष अधिवेशन सुरू होत आहे. त्यात मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण सादर होईल. सरकारने गेल्या सहा महिन्यात पश्चिम बंगालपासून महाराष्ट्रापर्यंत काय काय प्रयोग केले आहेत, हे लपलेले नाही. या विधेयकासाठी अजून 7 खासदारांचा पाठिंबा हवा आहे. बहुमताचा कसा होणार जुगाड?

Delimitation Bill 2026: अजून 7 खासदारांचा हवा पाठिंबा, सरकारने बाहेर काढला हुकमी एक्का, बहुमताचा कसा होणार जुगाड?

Delimitation Bill 2026: एप्रिल 2026… महिला आरक्षण बिलाआडून सरकार मतदारसंघ पुनर्रचना बिल लादण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप करत विरोधकांनी एकजूट दाखवली. दोन्ही बिलं बारगळली. संसदेत सरकार तोंडघशी पडले आणि भाजपने नवीन स्क्रीप्ट लिहियाला घेतली. पश्चिम बंगालमध्ये पहिला प्रयोग राबवला गेला. ममता बँनर्जी यांचा पक्ष उभा फुटला. त्यानंतर महाराष्ट्राकडे मोर्चा वळवण्यात आला. उद्धव सेनेला पुन्हा एकदा मोठा सुरूंग लागला. मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला विधेयकासाठी सरकारने अगोदरच मोठी तयारी केली होती. आता विधेयक मंजूरीचे सोपास्कार तेवढे पार पडणार आहे. अर्थात अजूनही 7 खासदारांचा जुगाड केंद्र सरकारला करावा लागणार आहे. प्रेमात आणि राजकारणात सर्व काही माफ असतं, अशी प्रसिद्ध राजकीय म्हण आहे. त्याची प्रचिती उभ्या देशाला यायला लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, डीएमकेने आता भूमिका बदलल्याचे दिसून येत आहे. बहुमताचा जुगाड करण्यासाठी मोदी सरकारने हुकमी एक्का बाहेर काढला आहे.

लोकसभेतील मतांचे गणित

नोव्हेंबर 2026 मध्ये लोकसभेत एकूण 540 सदस्य आहेत. तीन जागा रिक्त आहेत. सर्व सदस्यांनी मतदान केल्यास या विधेयकाला मंजूरी मिळण्यासाठी 360 मतांची गरज लागेल. सध्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे (NDA)320 खासदार आहे. एप्रिलमध्ये हे संख्याबळ 293 इतके होते. तृणूल काँग्रेसच्या 20 बंडखोर खासदारांनी आणि शिंदे सेनेत आलेल्या ठाकरे सेनेच्या सहा खासदार एनडीएत आल्याने रालोआचे संख्याबळ वाढले आहे. आता उर्वरीत 7 खासदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठीही सरकारने गणित सोडवलं आहे.

17 एप्रिल 2026 रोजी या दोन्ही विधेयकाच्या बाजूने 298 मतं पडली होती. तर विरोधात 230 मतं पडली होती. त्यावेळी सरकारला 54 मतांची गरज होती. मतांचा हा खड्डा भरून काढण्यात सरकारने काय केले हे उभ्या देशाने पाहिले आहे. आता रालोआबाहेरील द्रमुक (22), शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (8) आणि YSRCP (4) या पक्षांचे समर्थन मिळाल्यास बहुमताचा आकडा 354 पर्यंत जाईल. तरीही सरकारला बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 7 मतांची गरज आहे. तर 10 खासदारांनी मतदानावर बहिष्कार घातल्यास आवश्यक मतांची संख्या घटून ती 353 पर्यंत येऊ शकते. हाच हुकमी एक्का सत्ताधारी वापरण्याची शक्यता आहे. विरोधी गोटातील दहा खासदार जरी मतदान प्रक्रियेवेळी गैरहजर राहिले तरी सरकारचे मताचे गणित जुळून येईल.

राज्यसभेतील सध्याची स्थिती

वरिष्ठ सभागृह, राज्यसभेत एकूण 244 सदस्य आहेत, त्यात एक जागा रिक्त आहे. दोन तृतीयांश बहुमतासाठी सरकारला या सभागृहात 163 मतांची गरज आहे. एनडीएकडे 154 खासदार आहेत. त्यांना राज्यसभेत 9 मतांची गरज आहे. बीजू जनता दल 5 आणि YSRCP चे 4 खासदार समोबत आल्यास 163 मतांचा आकडा गाठता येऊ शकतो. तर द्रमुकचे 8 आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा एक खासदार सोबत आल्यास सरकारला 172 खासदारांचे संख्याबळ सिद्ध करता येईल. शरद पवार राष्ट्रवादी आणि द्रमुकने सरकारकडे या विधेयकाविषयी ज्या अटी आणि शर्ती मांडल्या होत्या. त्यातील अनेक पूर्ण झाल्याचे समजते. त्यामुळे हे दोन्ही पक्ष या विधेयकासाठी अनुकूल असल्याचे मानले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

MPSC Group C Extension : एमपीएससीच्या ‘गट-क’ पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर

Jaykumar Gore on Satara District Bank Chairman Election 2026: शंभुराज देसाईंनी धक्काबुक्कीचा वचपा काढला, अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर जयकुमार गोरेंचा चेहरा पडला, शांतपणे बाहेर चालत आले अन् म्हणाले…

FASTag वापरताय? बॅलन्स कमी असल्यास टोल नाक्यावर भरावा लागेल दुप्पट टोल; प्रवासाला निघण्यापूर्वी हे नियम जाणून घ्या

Latur DCC Bank Election Result 2026: लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निकाल जाहीर; देशमुखांच्या सहकार पॅनला स्पष्ट बहुमत, पाहा विजयी उमेदवारांची यादी

Pandharpur Ambegaon Well Collapse: विहिरीच्या मोजमापासाठी उतरले, अचानक ढिगारा कोसळल्याने अडकले; 24 तासांनी 4 मजूरांचे मृतदेह सापडले, पंढरपुरातील आंबेगावातील सुन्न करणारी घटना

अखेर आतली बातमी फुटलीच? विलिनीकरणावर विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान, कुणाला मंत्रिपद…