टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

IND vs PAK U19 Final: पाकिस्तानविरुद्ध 1 बॉलमध्ये 3 धावांची गरज, शेवटची विकेट हाती, टीम इंडियाचा नवा बाजीगर तळपला, अंडर 19 आशिया चषक जिंकला

On: November 14, 2026 7:33 PM
Follow Us:

IND vs PAK U19 Final: अंडर 19 आशिया कप च्या फायनलमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात रोमांचक लढत झाली.

IND vs PAK U19 Final अमिरात: अंडर 19 आशिया कप स्पर्धेच्या फायनलमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात रोमांचक लढत झाली. पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी करताना 337 धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना भारताच्या फलंदाजांनी लढाऊ बाणा दाखवला. मोहित उल्वाच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारतानं पाकिस्तानला पराभूत करत विजेतेपद पटाकवलं. ग्रुप स्टेजमधील पराभवाचा वचपा देखील टीम इंडियानं काढला. मनल चौहान आणि मोहित उल्वानं महत्त्वाची खेळी केली. मोहित उल्वानं अखेरच्या बॉलवर चौकार मारत विजेतेपद मिळवलं. भारताला एका बॉलवर 3 धावा हव्या होत्या,  मोहितनं चौकार मारला आणि टीम इंडियाला विजेतेपद मिळवून दिलं.

मोहित उल्वा भारताच्या विजयाचा हिरो ठरला. मोहित उल्वानं अखेरच्या बॉलवर 3 धावांची गरज असताना चौकार मारला आणि टीमला विजेतेपद मिळवून दिलं. या विजयासह भारतानं अंडर 19 आशिया कप जिंकला आहे. अनेक वर्षानंतर भारतानं अंडर 19 आशिया कपचं विजेतेपद मिळवलं आहे. मोहित उल्वा आणि मनल चौहान या दोघांनी नवव्या विकेटसाठी केलेली भागीदारी महत्त्वाची ठरली. मनल चौहान यानं 47 तर मोहित उल्वा यानं 49 धावा केल्या.

भारताच्या डावाची सुरुवात चांगली झाली होती. लक्ष्य रायचंदानी आणि आर्यवीर सेहवाग यांनी भारतासाठी 95 धावांची सलामाची भागीदारी केली. आर्यवीर सेहवागनं 58 धावा केल्या. तर, लक्ष्य रायचंदानी यानं 80 धावा केल्या. या दोघांशिवाय वीके. विनीत यानं 24, अर्जुन राजपूत यानं 16 धावा केल्या. तर, अरविंद द्रविड यानं 19 धावा केल्या. सी.वेंकटा यानं 11 धावा करत टीमच्या विजयात महत्त्वाचं योगदान दिलं. सी वेंकट आणि मोहित उल्वा या दोघांनी 30 धावांची भागीदारी करत भारताला विजेतेपद मिळवून दिलं आहे.

पाकिस्तानच्या विशाल धावसंख्येचा पाठलाग करताना भारताची स्थिती 8 बाद 252 धावा अशी झाली होती. भारताला विजयासाठी 86 धावा करायच्या होत्या, हातात 2 विकेट होत्या, त्यावेळी मनल आणि मोहित या दोघांनी 57 धावांची भागीदारी केली, हाच या मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला.

पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी करताना 337 धावा केल्या होत्या. पाकिस्तानचा सलामीवीर उस्मान खान यानं शतक केलं होतं. त्यानं अब्दुल कादिरच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी 135 धावांची भागीदारी केली होती. उस्मान यानं 111 बॉलमध्ये 3 षटकार आणि 11 चौकारांच्या मदतीनं 107 धावा केल्या होत्या. कादिर यानं 54 बॉलमध्ये 80 धावांची खेळी केली. त्यानं 8 षटकार आणि 3 चौकार मारले.

भारतासाठी सर्वाधिक विकेट परेश पटेल यानं घेतल्या. परेश पटेल यानं 10 ओव्हर गोलंदाजी करातना 68 धावा देत 4 विकेट घेतल्या. विजय सुभाषनं 3 विकेट घेतल्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

आर्यवीर सेहवाग आणि अन्वय द्रविडची ऑस्ट्रेलियाविरुद्ध कामगिरी; जाणून घ्या दोघांनी किती धावा केल्या

AUS vs BAN 1st Test : बांगलादेशनं क्रिकेटचा इतिहास-भूगोलच बदलला! ज्याची कुणी कल्पनाही केली नव्हती ते घडलं, ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदाच त्यांच्याच घरात लोळवलं

Ajinkya Rahane Retirement: अजिंक्य रहाणेचा क्रिकेटला रामराम, सगळ्या फॉर्मेटमधून निवृत्त, Video Viral

IND vs SL: श्रीलंकाविरुद्धच्या टेस्ट मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

6,6,4,4,4,4..! वैभव सूर्यवंशी झिम्बाब्वेला दणका, पुन्हा ठोकलं दणदणीत अर्धशतक

Vaibhav Sooryavanshi: थाला बनला वैभवचा फॅन, ‘वंडर बॉय’ने असा सिक्सर मारला की, स्टेडियममध्ये बसलेला धोनीही अवाक; रिअ‍ॅक्शनचा Video Viral