टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

अखेर पत्ता उघडला… शाह, योगी नव्हे, पुढचा पंतप्रधान या राज्यातून? उपराष्ट्रपतींच्या थेट विधानाने मोठी खळबळ

On: October 31, 2026 1:30 PM
Follow Us:

उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांनी पुढचा पंतप्रधान तमिळ व्यक्ती असू शकतो असे संकेत दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. मोदींनंतर अमित शाह, योगी किंवा शिवराज यांच्याऐवजी तमिळ नेतृत्व पंतप्रधान पदावर येईल, या वक्तव्याने अनेकांना धक्का बसला आहे.

अखेर पत्ता उघडला... शाह, योगी नव्हे, पुढचा पंतप्रधान या राज्यातून? उपराष्ट्रपतींच्या थेट विधानाने मोठी खळबळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नंतर अमित शाह, योगी आदित्यनाथ आणि शिवराज सिंह चौहान यांच्यापैकीच एकजण पंतप्रधान होणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसे संकेतही वेळोवेळी मिळत आले आहेत. मात्र, शाह, चौहान किंवा योगी हे पुढचे पंतप्रधान नसतील असे स्पष्ट संकेत उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांनी दिले आहेत. तामिळनाडूच्या पसुमपोन येथे आले असता त्यांनी हे संकेत दिले आहेत. पुढचा पंतप्रधान तमिळ व्यक्ती होण्याची शक्यता अधिक वाढली आहे, असं उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. उपराष्ट्रपतींच्या या विधानाचे वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात आहेत.

उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन मदुराईच्या मीनाक्षी अम्मन मंदिरात आले होते. यावेळी त्यांना पत्रकारांनी भविष्यातील पंतप्रधान कोण असेल? असा सवाल केला. त्यावर भविष्यात एखादा तमिळ व्यक्ती पंतप्रधान होण्याची शक्यता आहे. तमिळ व्यक्ती पंतप्रधान बनण्याची शक्यता नेहमी असते. आपल्या देशात प्रत्येकाला ही संधी असते. त्यामुळेच भविष्यात देशाचा पंतप्रधान एखादा तमिळ व्यक्ती होऊ शकतो, असं राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे..

कर्नाटक आणि गुजरातमधून…

यावेळी राधाकृष्णन यांनी माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा त्यांनी उल्लेख केला. आपल्याकडे कर्नाटकातून एक पंतप्रधान झालेला आहे. आता आपल्याकडे गुजरातममधून पंतप्रधान आहेत, असं त्यांनी सांगितलं. दरम्यान, तामिळनाडूतून कोणीच पंतप्रधान झालेला नाही. पण राज्यातील तीन लोक राष्ट्रपती आणि तीन लोक उपराष्ट्रपती झाले आहेत. तामिळनाडूतील तीन उपराष्ट्रपतींमध्ये राधाकृष्णन यांचाही समावेश आहे. राधाकृष्णन 1998 ते 2004 पर्यंत कोईम्बतूरमधून भाजपचे खासदार राहिलेले आहेत.

थलपती विजय यांना पतंप्रधान बनवा

उपराष्ट्रपतींची ही प्रतिक्रिया आल्यानंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांच्या फॅन्सनी विजय यांना पंतप्रधान बनवण्याची मागणी केली आहे. जोसेफ विजय हेच पंतप्रधान बनतील असं उपराष्ट्रपतींना म्हणायचं होतं, असा दावा विजय यांच्या चाहत्यांनी केला आहे. विजय यांच्याकडेच पंतप्रधान बनण्याची क्षमता आहे. ते देशाचे पंतप्रधान होतील, असं या चाहत्यांनी म्हटलं आहे.

विजयच दावेदार

मुख्यमंत्री विजय यांनी काही दिवसांपूर्वी विधानसभेत एक प्रस्ताव सादर केला होता. त्यात केंद्र सरकारने पारित केलेल्या परिसीमन विधेयकाचा विरोध करण्यात आला. या चर्चेवेळी टीव्हीकेचे महासचिव आणि बांधकाम मंत्री अधव अर्जुन यांनी राजकीय सत्ता केवळ उत्तर प्रदेश, बिहार आणि गुजरातपर्यंत मर्यादित नाहीये. तर दक्षिण भारतातील तामिळनाडूतूनही पंतप्रधान झाला पाहिजे असं म्हटलं होतं. विजय हेच पंतप्रधान पदाचे दावेदार असल्याचा त्यांचा रोख होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now