टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Rule Change 1 Nov : उद्यापासून भारतातील सर्व मोबाईलमध्ये ही सेवा उपलब्ध, मोबाईलच्या स्क्रीनवर फोन येताच..

On: October 31, 2026 1:16 PM
Follow Us:

Rule Change 1 Nov : कॉलर नेम प्रेझेंटेशन नावाचा एक नवीन नियम लागू होणार आहे. ज्यानंतर उद्यापासूनच हा बदल होणार आहे. भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने अलीकडेच काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या. त्यानुसार, उद्यापासून हे बदल होतील.

Rule Change 1 Nov : उद्यापासून भारतातील सर्व मोबाईलमध्ये ही सेवा उपलब्ध, मोबाईलच्या स्क्रीनवर फोन येताच..

उद्यापासून काही गोष्टींमध्ये मोठे बदल होणार आहेत. कॉलर नेम प्रेझेंटेशन नावाचा एक नवीन नियम लागू होणार आहे. भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने अलीकडेच यासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ज्यानंतर उद्यापासूनच हा बदल होणार आहे. भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने अलीकडेच काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या. त्यानुसार 1 नोव्हेंबरपासून सर्व स्मार्टफोन वापरणाऱ्यांच्या मोबाईवर समोरून फोन करणाऱ्या व्यक्तीचे नाव येणार. जर हा कॉल दुसऱ्या देशातून आला तर इंटरनॅशनल कॉल म्हणून लिहून येईल.अगोदर सर्वच नंबरला नाव येत नव्हती. आता सर्वच नंबरला फोन करणाऱ्या व्यक्तीचे नाव येईल. तो नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह नसला तरीही कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नाव येईल. विशेष म्हणजे त्या व्यक्तीचे नोंदणीकृत नाव येणार आहे.

CNAP सेवेअंतर्गत, 4G आणि 5G नेटवर्क वापरणाऱ्या ग्राहकांच्या मोबाइल स्क्रीनवर अनोळखी क्रमांकांशी संबंधित नावे दिसतील. ही सेवा बऱ्याच अंशी ट्रूकॉलर ॲपसारखीच आहे. पण ट्रूकॉलरवर नोंदणीकृत नाव येत नव्हते. एखाद्या व्यक्तीचे शार्टकर्ट नाव येत होते. हा मोठा बदल आता भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने केला.

ज्यामुळे आपल्याला फोन नक्की कोणाचा येत हे स्पष्ट होईल. तो फोन उचलायचा की नाही आणि नक्की कोण व्यक्ती आपल्याला फोन करत आहे हे देखील कळेल. आजकाल मोठ्या प्रमाणात अनोळखी लोकांकडून फोन करून फसवणूक केली जाते. यामुळे या घटना कमी होऊ शकतात. हा सरकारचा मोठा निर्णय आहे.

उदाहरणार्थ जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला फोन करते, त्यावेळी पहिल्या व्यक्तीचे नाव दुसऱ्या व्यक्तीच्या फोनच्या स्क्रीनवर येईल. जर अगोदरच त्या दुसऱ्या व्यक्तीचे नाव त्या व्यक्तीच्या फोनमध्ये सेव्ह असेल तर ते नाव तसेच येईल. पण सेव्ह नसले तरीही कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नाव फोन स्क्रीनवर येईल. हा एक अत्यंत मोठा बदल म्हणावा लागेल. ज्यामुळे आपल्याला नक्की फोन कोण करत आहे हे अगोदरच कळेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now