Jantar Mantar Protest Food : दिल्लीतील जंतरमंतरवर ‘डिजिटल अन्नछत्र’! सीजेपीच्या आंदोलनाला देशभरातून अन्नाची रसद; स्विगी, झोमॅटोच्या गाड्यांची रांगा लागल्याचं चित्र दिसून आलं.

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर मंगळवारी ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या (CJP) विरोध प्रदर्शनादरम्यान एक अनोखे आणि वेगळेच चित्र पाहायला मिळाले. दिवसभर हे आंदोलन स्थळ फूड डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्यांचा मुख्य अड्डा बनले होते. स्विगी, झोमॅटो यांसारख्या विविध कंपन्यांचे डिलिव्हरी बॉईज आपल्या दुचाकींवरून अन्नछत्रासारखी रसद पुरवताना(Jantar Mantar Protest Food) दिसले. राजधानी दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरु आहे. आंदोलकांना अनेकजणांकडून खाण्यापिण्याचे अनेक पदार्थ देण्यात येत आहेत. देशभरातील लोकं स्विगी, झोमॅटो सारख्या फूड डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून या आंदोलकांच्या जेवणाची सोय (Jantar Mantar Protest Food) करत आहेत. हे लोक स्विगी, झेमॅटोवरून जेवण ऑर्डर करत आहेत, आणि हे ऑर्डर केलेलं जेवणं जंतरमंतरमध्ये आंदोलासाठी बसलेल्या विद्यार्थ्यांना नेऊन देण्यास सांगत आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या जेवणाची व्यवस्था होत आहे. यावरून या आंदोलनाला देशभरातून किती मोठा पाठिंबा मिळत आहे हे दिसून येत आहे.(Jantar Mantar Protest Food)
Jantar Mantar Protest Food : देशभरातून डिजिटल ऑर्डरचा पाऊस
काही वृत्तांनुसार, मुंबई, हैदराबाद, दिल्ली यांसारख्या प्रमुख शहरांसह पंजाबमधील अनेक शहरांतून नागरिक घरबसल्या जंतरमंतरच्या पत्त्यावर ऑनलाईन जेवणाची ऑर्डर देत आहेत. “आंदोलन स्थळावरील कोणत्याही भूक लागलेल्या व्यक्तीला हे जेवण देऊन टाका,” असा मेसेज या ऑर्डर्ससोबत देण्यात येत आहे. यामुळे कनॉट प्लेस परिसरातील विविध उपाहारगृहांमध्ये (रेस्टॉरंट्स) अशा ऑनलाईन ऑर्डर्सचा अक्षरशः पाऊस पडत होता.(Jantar Mantar Protest Food) आकाश नावाच्या एका डिलिव्हरी बॉयने सांगितले की, “मी एकट्याने संध्याकाळी ४ वाजेपर्यंत जंतरमंतरवर किमान १० डिलिव्हरीज दिल्या आहेत. माझ्यासोबत आणखी ४-५ डिलिव्हरी बॉईज याच कामात व्यस्त होते.”

Jantar Mantar Protest Food : अंदाजे ५०० हून अधिक ऑर्डर्स!
एका वृत्ताने वर्तवलेल्या अंदाजानुसार, देशभरातील अज्ञात नागरिकांनी जंतरमंतरवरील आंदोलकांसाठी ५०० हून अधिक ऑर्डर्स बुक केल्या होत्या. यामध्ये पिझ्झा, बर्गर, समोसे, जेवणाची पूर्ण थाळी आणि इतर विविध खाद्यपदार्थांचा समावेश होता. सोशल मीडियावर या प्रसंगाचा एक व्हिडिओदेखील तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मुसळधार पावसातही बसलेल्या आंदोलकांना एक डिलिव्हरी बॉय खाण्याचे पॅकेट देताना दिसत आहे. “मुंबईतील एका नागरिकाने ऑनलाईन पेमेंट करून हे पार्सल पाठवले आहे,” असे तो डिलिव्हरी बॉय सांगताना दिसत आहे.
Jantar Mantar Protest Food : “कुणाही भुकेल्याला देऊन टाका…”
मुंबईचे रहिवासी अनुज रावत यांनी ही ऑर्डर केली होती. “जंतरमंतरवर जेवण देऊन तेथील कोणत्याही भुकेल्या व्यक्तीला द्या,” असा विशेष संदेश त्यांनी डिलिव्हरी बॉयला दिला होता.अनेक तरुण संसद मार्ग आणि जनपथ रस्त्यावर डिलिव्हरी बॉईजकडून पार्सल्स घेऊन आंदोलकांपर्यंत पोहोचवताना दिसले.
Jantar Mantar Protest Food : स्थानिकांकडूनही मदतीचा ओघ
केवळ ऑनलाईन ऑर्डर्सच नाही, तर आंदोलन स्थळाच्या आत, बाहेर आणि जाणाऱ्या रस्त्यांवर लोकांनी आपापल्या क्षमतेनुसार मदत केंद्र उभारले होते. पिण्याचे पाणी, कोल्ड ड्रिंक्स, आईस्क्रीम, बिस्किटे, फळे, कढी-भात, बिर्याणी, ज्यूस आणि चॉकलेट्स यांसारख्या वस्तूंचे स्टॉल लावून तसेच फिरून वाटप केले जात होते. पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करणाऱ्या एका नोकरदार तरुणीने सांगितले की, तिने आपल्या अर्ध्या दिवसाचा पगार आंदोलकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी खर्च केला आहे.















