टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Maharashtra Live News : दिवसभरातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स पाहा एका क्लिकवर

Marathi News Live : शेतकरी कर्जमाफीची घोषणा केलेली असली तरी अद्याप कर्जमाफी झालेली नाही तरीही स्वतःची पाठ थोपटून घेण्याचे काम सुरु आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांना वीजबील माफ केल्याची घोषणा करण्यात आली आहे, ही घोषणाही फसवी व दिशाभूल करणारी आहे. वीज बील माफीची घोषणा ही शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी नाही तर लाडका उद्योगपती अदानीसाठी केलेली आहे. भाजपा सरकारला एमएसईबी च्या चारही विभागाचे खाजगीकरण करून ते अदानीला आंदण द्यायचे आहे, त्याच्या फायद्यासाठी ही घोषणा आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलेले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होत असल्याने दिल्लीत आणि त्या अनुषंगाने राज्यातही झपाट्याने राजकीय घडामोडी घडत आहेत. अशावेळी या दोन्ही ठिकाणच्या चर्चेच्या केंद्रस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच असल्याने प्रसारमाध्यमांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला आहे.

  • 01:35 PM, Jul 17 2026

    Nanded Crime : मुलांना शाळेत सोडण्याचा बहाणा, धावती कार थेट नदीपात्रात, स्टेटस ठेवत शिक्षकाने सोन्यासारख्या लेकरांसह आयुष्य संपवलं

    नांदेड जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या एका शिक्षकानं आपल्या दोन मुलांसह पुलावरून गोदावरी नदीत कार टाकून आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नांदेड शहरालगत असलेल्या आमदुरा पुलाजवळ आज शुक्रवारी सकाळी ही मन हेलावणारी घटना घडली.
  • 01:04 PM, Jul 17 2026

    8th Pay Commission : 8व्या वेतन आयोगात अपेक्षेपेक्षा जास्त मिळणार, फक्त पगार नाही HRA दणकावून वाढणार; घरभाडे भत्त्यात सुधारणा होणार

    देशभरातील केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांमध्ये सध्या आठव्या वेतन आयोगाबद्दल भरपूर उत्साह पाहायला मिळत आहे. बहुतेक कर्मचारी यंदा बेसिक सॅलरीत वाढीची अपेक्षा करत आहेत, पण वेतनातील आणखी एक महत्त्वाचा घटक घरभाडे भत्ता – HRA – कडेही तितकेच लक्ष देण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आठव्या वेतन आयोगाने अद्याप फिटमेंट फॅक्टरबद्दल कोणताही अंतिम निर्णय घेतलेला असून वेगवेगळ्या गुणकांनुसार केलेल्या अंदाजांवरून वेतन स्तर 14, 15 आणि 16 मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यात लक्षणीय बदल होताना दिसून येत आहे.
  • 12:13 PM, Jul 17 2026

    Hydrogen Train : आजचा दिवस भारतीयांसाठी खास! देशातील पहिल्या Hydrogen Train ला हिरवा झेंडा, कसा असेल रुट? किती असेल तिकीट?

    आज भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन धावणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील आणि त्यानंतर ही ट्रेन सुरू होईल. देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनचा शुभारंभ होत आहे. डिझेलचा धूर नाही की विजेच्या ओव्हरहेड तारांचे टेन्शन नाही; ही ट्रेन चक्क पाण्यापासून तयार होणाऱ्या ऊर्जेवर धावणार आहे.
  • 11:17 AM, Jul 17 2026

    Rohit Sharma : रोहित शर्माचा लॉर्ड्सवर शेवटचा सामना? हिटमॅनला वगळत BCCIकडून मिशन वर्ल्ड कप 2027ची तयारी

    दुसऱ्या वनडे सामन्यामध्ये इंग्लंड संघाने ४ विकेटने भारताचा पराभव केला. पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर इंग्लंडने कमबॅक करत मालिका १-१ने बरोबरीत सोडवली आहे. हा सामना गमावल्यावर एक मोठी अपडेट समोर आली असून भारताची माजी कर्णधार रोहित शर्मा याचा लॉर्ड्सवरील सामना हा अखेरचा असल्याचं बोललं जात आहे. या मालिकेनंतर वेस्ट इंडिजच्या मालिकेत रोहित शर्माला वगळून यशस्वी जयस्वालची संघात एन्ट्री करणार असल्याचं माहिती समोर आली आहे.
  • 10:25 AM, Jul 17 2026

    Crime News : कारमध्ये आईला संपवलं, 14 महिन्यांच्या लेकराला नदीत फेकलं, छ.संभाजीनगरमधील ‘त्या’ मृत्यू प्रकरणाचा थरारक उलगडा; कारण काय?

    एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 1 एप्रिल 2026 रोजी बेपत्ता झालेल्या 26 वर्षीय सायमा सलमान चौधरी आणि तिच्या 14 महिन्यांच्या चिमुकल्याची अत्यंत निर्घृण आणि अमानुष हत्या करण्यात आल्याचं धक्कादायक वास्तव उघडकीस आलं आहे. पैशांच्या आर्थिक व्यवहारातून विवाहितेचा ओढणीने गळा आवळून खून करण्यात आला आणि त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी पोटच्या पोराला चालू नदी-नाल्यात फेकून देऊन त्यालाही ठार मारल्याचा गंभीर आरोप फिर्यादीने केला आहे. वाळूज पोलिसांनी या प्रकरणी दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास नाशिक पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
  • 09:49 AM, Jul 17 2026

    Maharashtra Politics : जयंत पाटलांच्या भेटीगाठी सुरुच, फडणवीसांनंतर शिंदेंसोबत खलबतं, विरोध मोडण्यासाठी ‘अर्थ’पूर्ण बैठकीची चर्चा

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी गुरुवारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शिंदे यांच्या नंदनवन या निवासस्थानी पाटील यांनी त्यांची भेट घेतली. दोघांमध्ये साधारण तासभर चर्चा झाली, परंतु त्याचा तपशील मिळू शकलेला नाही. सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी ईश्वरपूरच्या नगराध्यक्षांवर अपात्रतेची कारवाई केली आहे. चुकीच्या पद्धतीने झालेल्या या कारवाईबद्दल आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती, असा खुलासा पाटील यांनी केला. याशिवाय या प्रश्नावर नगरविकास खाते असलेल्या एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे पाटील यांनी सांगितले होते. त्यानुसार ही भेट झाल्याचे बोलले जात आहे.
  • 08:44 AM, Jul 17 2026

    Chhatrapati Sambhajinagar News : खाकी वर्दीला काळीमा! हॉटेल अन् घरात शिक्षिकेवर जबरदस्ती अत्याचार, PSIचा कारनामा, कारमध्ये मारहाण करुन रस्त्यावर सोडलं

    शहर पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या विकृत कृत्यामुळे संपूर्ण खाकी वर्दीला काळीमा फासली गेली आहे. शहरातील एका खासगी शाळेत शिकवणाऱ्या 48 वर्षीय विवाहित शिक्षिकेला धमकावून, हॉटेल आणि राहत्या घरात नेऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी 53 वर्षीय पोलीस उपनिरीक्षक हरीश खटावकर याच्याविरुद्ध जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीत शिक्षिकेने विरोध केला असता तिला धावत्या कारमध्ये डांबून बेदम मारहाण करण्यात आली आणि तिचा मोबाईल हिसकावून तिला मध्यरात्री रस्त्यावर सोडून देण्यात आलं.
  • 08:02 AM, Jul 17 2026

    Mumbai Local : CSMT फास्ट लोकलच्या लेडीज फर्स्ट क्लासमध्ये डाऊन मारण्यावरुन वाद, महिलेने सहप्रवाशांवर पेपर स्प्रे फवारल्याने गोंधळ

    धावत्या लोकलमध्ये क्षुल्लक कारणांमुळे दोन प्रवाशांना जीव गमवावा लागल्याच्या घटनांनंतरही प्रवाशांमधील क्रोधाग्नी शांत झालेला नाही. लोकलमध्ये प्रवाशांचा संताप अनावर होऊन हाणामारीच्या घटनांची मालिका कायम आहे. हाणामारी, सहप्रवाशावर पेपर स्प्रे फवारणी, हातात काठी घेऊन प्रवाशांमध्ये दहशत पसरवणे, अशा तीन घटना गुरुवारी उघडकीस आल्या. तर, हाणामारीच्या चौथ्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, तो नेमका कुठला, याचा शोध सुरू आहे.
  • 08:01 AM, Jul 17 2026

    Ramraksha Vs Hanuman Chalisa : रामरक्षा विरुद्ध हनुमान चालीसा; विदर्भात 18 जुलैला ठाकरे-राणा आमनेसामने

    अयोध्येतील कथित दान अपहारावरून शिवसेना (उबाठा) आक्रमक झाली असून, पक्षाने राज्यभरात रामरक्षा आंदोलन छेडले आहे. मुंबईनंतर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थेट नागपुरात शक्तिप्रदर्शन करणार आहेत. ठाकरेंच्या या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून माजी खासदार नवनीत राणा उद्या, १८ जुलैला अमरावती शहराजवळील प्रसिद्ध हनुमान गढी येथे हनुमान चालीसाचे पठण करणार आहेत.
  • 08:01 AM, Jul 17 2026

    Devendra Fadnavis Eknath Shinde : दिल्लीत जाणार का, मुख्यमंत्री होणार का? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांवर प्रश्नांचा भडिमार

    केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होत असल्याने दिल्लीत आणि त्या अनुषंगाने राज्यातही झपाट्याने राजकीय घडामोडी घडत आहेत. अशावेळी या दोन्ही ठिकाणच्या चर्चेच्या केंद्रस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच असल्याने प्रसारमाध्यमांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला आहे.
  • 08:01 AM, Jul 17 2026

    Harshwardhan Sapkal : वीजबील माफीची घोषणा शेतकऱ्यांसाठी नव्हे, तर लाडक्या अदानीसाठी; हर्षवर्धन सपकाळांचा आरोप

    शेतकरी कर्जमाफीची घोषणा केलेली असली तरी अद्याप कर्जमाफी झालेली नाही तरीही स्वतःची पाठ थोपटून घेण्याचे काम सुरु आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांना वीजबील माफ केल्याची घोषणा करण्यात आली आहे, ही घोषणाही फसवी व दिशाभूल करणारी आहे. वीज बील माफीची घोषणा ही शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी नाही तर लाडका उद्योगपती अदानीसाठी केलेली आहे. भाजपा सरकारला एमएसईबी च्या चारही विभागाचे खाजगीकरण करून ते अदानीला आंदण द्यायचे आहे, त्याच्या फायद्यासाठी ही घोषणा आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलेले आहे.
    08:00 AM, Jul 17 2026

    Mira Road Crane Collapse : मीरा रोड येथे मोठी दुर्घटना, बांधकाम क्रेन कोसळली, बचावकार्य युद्ध पातळीवर सुरु

    मीरा रोड येथे मोठी दुर्घटना घडली आहे. अकराव्या मजल्यावरुन क्रेन कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत आतापर्यंत एका जणाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी आहे. मीरा रोड येथे इमारतीचं बांधकाम सुरु होतं. पण या बांधकामादरम्यान मोठा अपघात घडला आहे. एक क्रेन थेट अकराव्या मजल्यावरुन बाजूच्या इमारतीच्या आवारात कोसळली आहे. ही क्रेन बाजूच्या सोसायटीतील पार्किंगमध्ये कोसळली आहे. या घटनेत अनेक चारचाकी गाड्यांचा चक्काचूर झाला आहे. तसेच अनेक जण या क्रेनखाली दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now