टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

शिवसेनेची ताकद वाढली; सचिन अहिर यांच्यानंतर आणखी एक आमदार फुटला, शिंदे म्हणाले….

विधानपरिषद आमदार सचिन अहिर यांनीही शिंदे गटात एंट्री केली. सचिन अहिर यांच्यानंतर आता शिक्षक आमदार किरण सरनाईक यांनीही शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे.

शिवसेनेची ताकद वाढली; सचिन अहिर यांच्यानंतर आणखी एक आमदार फुटला, शिंदे म्हणाले....

राज्यात खासदार- आमदार फुटीमुळे राजकीय घडामोडींना वेग येताना दिसत आहे. एकापाठोपाठ खासदार-आमदार फुटत असल्याने विरोधकांना मोठे धक्के पचवावे लागत आहे. काही दिवसांपूर्वी 6 खासदार शिंदे गटात गेले. त्यानंतर विधानपरिषद आमदार सचिन अहिर यांनीही शिंदे गटात एंट्री केली. सचिन अहिर यांच्यानंतर आता शिक्षक आमदार किरण सरनाईक यांनीही शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. शिक्षक आमदाराच्या पाठिंब्यामुळे राज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ताकद वाढली आहे. अमरावतीमधील शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या पाठिंब्यामुळे राजकीय समीकरण बदलताना दिसणार आहे.

दोन दिवसांपूर्वी ठाकरेंचे विश्वासू मानले जाणाऱ्या सचिन अहिर यांनी शिंदे गटाच्या माध्यमातून उपसभापतीपदाचा अर्ज भरला. त्यानंतर काल त्यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली. ठाकरे गटाच्या सचिन अहिर यांची उपसभापतीपदी वर्णी लागल्याने उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसल्याचे पाहायला मिळाले. ठाकरे गटाच्या लोकप्रतिनिधींची दिवसेंदिवस संख्या कमी होताना दिसत आहे. ठाकरेंच्या आमदार-खासदारांची संख्या कमी होत असल्याने विरोधी पक्षाची ताकद कमी होताना दिसत आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षाला आणखी एका आमदाराने पाठिंबा दिला आहे. यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार किरण सरनाईक यांनी माध्यमांशी संवाद साधत भूमिका स्पष्ट केली.

 

किरण सरनाईक यांचं पक्षात स्वागत : एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे म्हणाले, मागील आठवड्यात सहा खासदार शिवसेना पक्षात सामील झाले. त्यानंतर विधानपरिषदेचे आमदार सचिन अहिर देखील शिवसेनेत आले. आपल्याकडे आधीच प्रताप सरनाईक आहेत. त्यानंतर दुसरे एक सरनाईक पक्षात येत आहे. आता शिक्षक आमदार किरण सरनाईक पक्षात येणार आहेत. ते शिवसेनेचे सहयोगी सदस्य म्हणून काम करणार आहेत. मी त्यांचं मनापासून शिवसेनेत स्वागत करतो’.

किरण सरनाईक काय म्हणाले?

आमदार किरण सरनाईक म्हणाले, ‘राज्याचे तडफदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला शिवसेनेच्या पदरात घेतलं. त्यांनी भविष्यात आधार देण्याचे आश्वासन दिलं. त्याबद्दल एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो. पत्रकार परिषदेला उपस्थित राहिलेल्या शिक्षकांचेही आभार मानतो’.

हे सुद्धा वाचा

कर्जमाफी लाभार्थ्यांच्या यादीत नाव हुडकायचं कसं? जाणून घ्या एका क्लिकवर, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट

Gold Rate Today : सोन्याने टेन्शन वाढवलं ना भाऊ, किमती धडाधड…आजचे 10 ग्रॅमचे दर..

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

कर्जमाफी लाभार्थ्यांच्या यादीत नाव हुडकायचं कसं? जाणून घ्या एका क्लिकवर, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट

मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार? ठाकरेंची सूचक प्रतिक्रिया.. पुन्हा महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ?

Rain Update : महाराष्ट्रात या तारखेला पाऊस घालणार धुमाकूळ, थेट मुसळधार पावसाचा इशारा, जुलैच्या..

ओमराजे निंबाळकर यांचे मंत्रिपदाबद्दल मोठे विधान, थेट म्हणाले, पद मिळवण्यासाठी..

“दादा, तुमच्या जाण्याने फरक पडलाय!”, बड्या नेत्याच्या पोस्टमुळे राष्ट्रवादीत मोठी खळबळ, नाराजीच्या चर्चांना उधाण

Tukaram Mundhe: बाहेर जाऊन धाडी टाकण्यापेक्षा… आमदार अभिजीत पाटील यांनी तुकाराम मुंढे यांना दाखवला आरसा, त्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?