टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

“दादा, तुमच्या जाण्याने फरक पडलाय!”, बड्या नेत्याच्या पोस्टमुळे राष्ट्रवादीत मोठी खळबळ, नाराजीच्या चर्चांना उधाण

On: June 28, 2026 11:49 AM
Follow Us:

Salim Sarang on Ajit Pawar Social Media Post: “दादा, तुमच्या जाण्याने फरक पडलाय!” या फेसबुक पोस्टने राष्ट्रवादीत खळबळ उडाली आहे. अडचणीत कोणी विचारेना, राष्ट्रवादीतील बडे नेते, कार्यकर्त्यांना आता अजितदादांची उणीव भासत असल्याचे समोर आले आहे.

दादा, तुमच्या जाण्याने फरक पडलाय!, बड्या नेत्याच्या पोस्टमुळे राष्ट्रवादीत मोठी खळबळ, नाराजीच्या चर्चांना उधाण
Salim Sarang on Ajit Pawar Social Media Post: “दादा, तुमच्या जाण्याने फरक पडलाय!” सलीम सारंग यांच्या या फेसबुक पोस्टने राष्ट्रवादीत खळबळ उडाली आहे. अजित दादांचे विश्वासू सलीम सारंग यांच्या भावनिक पोस्टमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहेत. सारंग यांच्या पोस्टने खळबळ उडाली आहे. ते राष्ट्रवादीत नाराज असल्याचे समोर आले आहे, तर ते राष्ट्रवादी सोडण्याच्या चर्चांना वेग आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अजितदादांच्या नेतृत्वाची उणीव भासत आहे. वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधणे दुरापास्त झाल्यामुळे मोठी पोकळी निर्माण झाल्याचे सारंग यांच्या पोस्टमधून समोर आले आहे. दादांना जाऊन पाच महिने उलटले आहे, त्याच आठवणीत खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा एक फोटो पोस्ट करत भावनिक पोस्ट लिहिली आहे.

कार्यकर्त्यांचा आवाज आता ऐकला जात नाही

कार्यकर्त्यांचा आवाज आता ऐकला जात नाही, अशी घणाघाती टीका सलीम सारंग यांनी केली आहे. पाच महिन्यांनंतर व्यक्त झालेल्या भावनांमुळे पक्षातील अंतर्गत अस्वस्थतेची चर्चा समोर आली आहे. अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सलीम सारंग यांच्या एका भावनिक फेसबुक पोस्टमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

अजित पवार यांच्या निधनाला पाच महिने पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सारंग यांनी व्यक्त केलेल्या भावना केवळ श्रद्धांजलीपुरत्या मर्यादित नसून, सध्याच्या पक्षातील कार्यपद्धतीवर अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त करणाऱ्या असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

आता स्वतःची ओळख द्यावी लागते

या पोस्टमध्ये सलीम सारंग यांनी मनाला लागलेली बोचणी मांडली आहे. “आता स्वतःची ओळख सांगावी लागते, भेटीसाठी अपॉइंटमेंट घ्यावी लागते, अनेकदा विनंती करूनही उत्तर मिळत नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. कार्यकर्त्यांचा आवाज वर पर्यंत पोहोचतोय की नाही, हा प्रश्न पडू लागला आहे, अशा शब्दांत त्यांनी खंत व्यक्त केली आहे. या विधानांकडे पक्षातील बदललेल्या वातावरणावर केलेले भाष्य म्हणून पाहिले जात आहे. अल्पसंख्याक समाजात प्रभावी नेतृत्व असलेल्या सलीम सारंग यांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत घडामोडींविषयी नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. कार्यकर्त्यांमध्येही या पोस्टची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू असून, आगामी काळात सारंग यांची राजकीय भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now