Uddhav Thackeray on Sanjay Dina Patil : उद्धव ठाकरे यांनी थेट फुटलेले खासदार संजय दीना पाटलांच्या मतदारसंघात सभा घेत हल्लाबोल केला. यावेळी सभेला प्रचंड शिवसैनिकांची गर्दी दिसून आली.

Uddhav Thackeray on Sanjay Dina Patil :
1/9
Shivsena Opration Tiger: शिवसेनेचे ॲापरेशन टायगर (Shivsena Opration Tiger) यशस्वी झालं आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या 6 खासदारांची आज राजकीय अधिकृत भूमिका जाहीर होणार आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिलेले ठाकरे गटाच्या 6 खासदारांचे संमती पत्र आणि सर्व खासदारांचे एकत्र फोटो, व्हिडीओ आज प्रसिद्ध होणार आहेत.
2/9
ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने आता NDA मध्ये शिवसेनेच्या लोकसभा खासदारांची संख्या 13वर पोहोचणार आहे. शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज विधान भवनात प्रसार माध्यमांशी साधणार संवाद साधणार आहे. (Shivsena Opration Tiger)
3/9
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा खासदार पक्षाची साथ सोडत शिवसेनेचे ॲापरेशन टायगर (Shivsena Opration Tiger) यशस्वी झालंय यावर शिक्कामोर्तब झालं आहे. ऑपरेशन टायगरमध्ये ठाकरेंच्या सेनेच्या खासदारांपैकी संजय देशमुख, संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांचा समावेश आहे.
4/9
या खासदारांपैकी माध्यमांच्या संपर्कात केवळ संजय दिना पाटील होते. संजय दिना पाटील हे ईशान्य मुंबईचे खासदार आहेत. त्यांनी पक्षाच्या दिल्लीतील बैठकीला जाणार असल्याचं म्हटलं होतं, मात्र ते अजूनपर्यंत दिल्लीत पक्षाच्या बैठकीसाठी पोहोचले नाहीत, त्यामुळं त्यांनी माध्यमांशी बोलताना खोटेपणा केल्याची चर्चा सुरु झाली आहे.
5/9
तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी थेट मैदानात उतरत आता या खासदारांच्या विरोधात आघडी उघडली आहे. उद्धव ठाकरे यांनी थेट फुटलेले खासदार संजय दीना पाटलांच्या मतदारसंघात सभा घेत हल्लाबोल केला. यावेळी सभेला प्रचंड शिवसैनिकांची गर्दी दिसून आली.
6/9
ईशान्य मुंबई मतदारसंघावर बोलताना ते म्हणाले की, इथून जर पाहिलं तर शिवसैनिक नाही तर पेटलेल्या मशाली दिसत आहे. गद्दार आणि गद्दारांच्या बापांना मी धन्यवाद देतो की तुम्ही या मशाली पुन्हा पेटवल्या. वर्धापन दिनाच्या दिवशी जे बोललो आणि ते मी करणार आहे आणि त्यांची सुरुवात करत आहे. जिथे जिथे गद्दारी झाली तेथे मी जाऊन मतदारांची माफी मागत आहे.
7/9
शिवसेना आणि मशालीकडे पाहून मतदारांनी निवडून दिलं. उमेदवार म्हणून निवडले होते आणि ती चूक म्हणून मी तुमची माफी मागतो. अनेकदा शिवसेना फोडली तोडली. त्यांनी सांगितले की, ज्या भाजपला गल्लीतलं कुत्र विचारत नव्हतं तेव्हा त्याचं बोट धरून मोठं केलं.
8/9
नाही, तर कोणीही विचारत नव्हते. अख्ख्या देशात फक्त दोन खासदार होते. स्वतःचं काहीच नाही, दुसऱ्यांची पोरं चोरून मोठी झालेली पार्टी आहे.
9/9
काँग्रेसने कधीही शिवसेना चोरण्याचा किंवा संपवण्याचा प्रयत्न केले नाही तो भाजपने केला. ज्यांना लढायचं त्यांनी समोर मैदानात येऊन लढा, असे आव्हान त्यांनी दिले.












