टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Omraje Nimbalkar: पवनराजे निंबाळकर खटल्याचा निकाल विरोधात जाताच ओमराजेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले, ‘शिंदे गटात जायचं की नाही, अजून ठरवलं नाही’

On: June 20, 2026 2:06 PM
Follow Us:

Omraje Nimbalkar: ओमराजे निंबाळकर यांच्यासह ठाकरे गटाचे सहा खासदार शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा आहे. ओमराजे यांच्यावर प्रचंड टीका झाली आहे.

कोर्टाच्या निकालावर ओमराजे निंबाळकर काय म्हणाले?

20 वर्षांनंतर कोर्टाच्या निकालावर बोलताना ओमराजे निंबाळकर म्हणाले, दुर्देवाने जो निकाल आहे, त्या निकालाला आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. उच्च न्यायालयाकडून आता न्यायाची अपेक्षा आहे. कोर्टाचा निकाल आहे आणि तो प्रत्येकाला स्वीकारावाच लागतो. हा पण त्याबाबत आम्ही उच्च न्यायालयात अपील करणार आहोत. शेवटपर्यंत याकरिता आम्ही संघर्ष करणार आहोत. कोर्टात जे पुरावे आहेत, ते पुढे येणार आहेत. या प्रकरणाचा पहिल्यांदा तपास मुंबई पोलिस करत होते आणि मुंबई पोलिसांवर प्रचंड दबाव होता. त्यानंतर हा तपास सीआयडीकडे देण्यात आला. त्यांच्यावरही प्रचंड दबाव होता. म्हणून आम्ही 2008 मध्ये उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते

Anil Desai:  ओमराजेंना आमच्यासोबत परत यायचं असेल तर उद्धव ठाकरे…. अनिल देसाई काय म्हणाले?

ज्या केसबद्दल ओमराजे निंबाळकर यांचं पूर्ण लक्ष, फक्त लक्ष नाही जीवनातील मोठ्या संघर्षाचा भाग होता. त्यांना केलेले वादे, त्यांना दिलेली प्रॉमिसेस असतील, ज्या काही गोष्टी त्यांना सांगितल्या असतील, असं होणार तसं होणार,त्याच्यावर ते स्वार होऊन ते दिसत होते.याच्यावर ते स्वार आहेत, त्यांना पूर्ण विश्वास होता, तो विश्वासघात झाला आहे.

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत बोलावं, ते निर्णय घेतील. परंतु पक्षाच्या महत्त्वाच्या शिस्तीबाबत त्यांनी शिस्तमोड केलेली आहे. पक्षानं घेतलेल्या बैठकीवर, मिटिंगवर एकप्रकारचा बहिष्कार टाकलेला होता, ते आले नव्हते. त्यांनी पक्षशिस्तीचा भंग केलेला आहे.

ओमराजे यांच्या जीवनातील सर्वात मोठा संघर्ष त्यांच्या वडिलांची हत्या झाल्यानंतर ते प्रकरण कोर्टात गेलं होतं. 20 वर्ष  ते याचा पाठपुरावा करत होते, सुनावणी झाली, न्यायालयीन प्रक्रियेतील गोष्टी झाल्या. शिवसेनेची बैठक बोलावली होती, ओमराजे यांनी पक्षाच्या शिस्तीचा भंग केला, ते बैठकीला आले नाहीत.  20 तारखेला निकाल लागला नंतर निर्णय घेऊ म्हणत होते. ओमराजे निंबाळकर यांच्या पदरी संघर्षानंतर निराशा आली आहे. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आता जर ते आमच्या सोबत राहण्याचा विचार करत असतील तर त्यावर निर्णय पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे निर्णय घेण्यास सक्षम आहेत, असं अनिल देसाई म्हणाले.

हे सुद्धा वाचा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now