top news
सोलापुरातील ‘तो’ किस्सा सांगताना गडकरींच्या डोळ्यात तरळले अश्रू
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे नेहमीच आपल्या बिनधास्त वक्तव्यांनी चर्चेत असतात. मुंबईतील आयआटीआयमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात गडकरींनी स्वत:च्या लग्नाबाबत आणि नोकरीबाबत मोठे खुलासे केले आहेत.
त्याची सोशल मीडियावर फार चर्चा होत आहे. जेव्हा मी महाराष्ट्रात सार्वजनिक बांधकाम विभागाचा मंत्री होतो तेव्हा सोलापूरच्या गेस्ट हाऊसमध्ये एक व्यक्ती होता.
तो नेहमी माझ्यासाठी डबा घेऊन यायचा. माझं मंत्रिपद गेलं परंतु त्यानंतर मी जेव्हा-जेव्हा सोलापूरला गेलो, तेव्हा तो माझ्यासाठी डबा घेऊन यायचा.
त्यावेळी मी त्यांना विचारलं की आता मी मंत्री नाही तरी तुम्ही मला डबा घेऊन का येता? तेव्हा तो म्हणाला की, सर तुम्ही मंत्री असताना माझं प्रमोशन केलं, माझ्याशी चांगलं वागलात. मला आता काही नको. तुम्ही मी आणलेली पोळी-भाजी खाल्ली तर मला आनंद होईल, असं तो म्हणाला आणि त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. असे म्हणत गडकरी यांनी सर्वांशी चांगले वागण्याचा सल्ला दिला.