टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Omraje Nimbalkar and Aaditya Thackeray: पक्ष सोडताच ओमराजे निंबाळकरांचा पहिला वार, म्हणाले, उद्धव ठाकरेंचं समजू शकतो, पण आदित्य ठाकरेंनी….

Omraje Nimbalkar and Aaditya Thackeray: भावनिकदृष्ट्या पक्ष सोडण्याचा विचार केला तर निर्णय चुकीचा वाटतो. मात्र, राजकीयदृष्ट्या विचार केला तर बरोबर आहे, असे देखील ओमराजे म्हणाले.

Omraje Nimbalkar and Aaditya Thackeray: राज्याच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’ (Operation Tiger) अंतर्गत शिवसेना ठाकरे गटाला (Shivsena UBT) लागलेली मोठी गळती आता उघड झाली आहे. ठाकरे गटाचे 6 खासदार पक्षाचा व्हीप (Whip) धुडकावून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करणार हे जवळपास निश्चित झाले आहे. या बंडखोर खासदारांच्या यादीत धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. पक्ष सोडण्याच्या या मोठ्या निर्णयावर एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ओमराजे निंबाळकर यांनी आपली भूमिका अत्यंत स्पष्टपणे मांडली असून ठाकरे गटाच्या नेतृत्वावर, विशेषतः आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर थेट निशाणा साधला आहे.

Omraje Nimbalkar and Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंनी अधिक सक्रिय राहायला हवे होते

मुलाखतीदरम्यान ओमराजे निंबाळकर यांनी महायुती (Mahayuti) सरकारच्या नेतृत्वाचे कौतुक करताना ठाकरे गटाच्या कार्यपद्धतीवर अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली. ओमराजे म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सतत कार्यकर्त्यांमध्ये फिरतात, मेहनत घेतात. तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आरोग्याच्या कारणांमुळे सातत्याने फिरणे शक्य नसले तरी आदित्य ठाकरे यांनी अधिक सक्रिय राहायला हवे होते, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

Omraje Nimbalkar: मोठ्या धर्मसंकटात; इमोशनली चुकीचं, पण पॉलिटिकली बरोबर 

पक्षांतराच्या निर्णयावर बोलताना ओमराजे भावूक म्हणाले की, “मी सध्या मोठ्या धर्मसंकटात आहे. भावनिक दृष्ट्या पक्ष सोडण्याचा विचार केला तर निर्णय चुकीचा वाटतो. मात्र, राजकीयदृष्ट्या विचार केला तर बरोबर आहे,” असे त्यांनी म्हटले आहे.

Omraje Nimbalkar: ठाकरेंच्या सेनेत राहिल्यास राजकीय अस्तित्व धोक्यात!

बंडखोरीमागचे कारण स्पष्ट करताना ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले की, “आम्ही खासदार असूनही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत स्वतःची माणसं निवडून येत नसतील, तर भविष्यात राजकीय अस्तित्व धोक्यात येऊ शकते, असे त्यांनी म्हटले. तर मतदारसंघात रस्ते, पूल, डीपी यांसारखी कामे करण्यासाठी वारंवार प्रस्ताव देऊनही कामे होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सत्ता आणि निधी नसल्याने लोकांची कामे करता येत नाहीत, असे देखील ओमराजे निंबाळकर म्हणाले.

Omraje Nimbalkar: पैसे किंवा सुरक्षेच्या चर्चा खोट्या; अंतिम निर्णय 20 जूननंतर

पक्षांतरासाठी कोट्यवधी रुपये किंवा ‘वाय प्लस’ सुरक्षा मिळाल्याच्या चर्चांचा ओमराजे यांनी कडक शब्दांत इन्कार (Denial) केला. “हा निर्णय केवळ मतदारसंघाच्या विकासासाठी आहे. माझ्यावर शिंदेसेनेत प्रवेश करण्यासाठी कार्यकर्त्यांचा मोठा दबाव आहे. परंतु, माझे वडील पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणाच्या कोर्टाच्या निकालानंतर, सर्व कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करून मी माझा अंतिम निर्णय 20 जूननंतर जाहीर करणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Operation Tiger UBT Solapur : अरे ओमराजे स्वर्गात तरी गद्दारी करु नको; संजय जाधवा, वाकचौऱ्या… तुम्हाला नरकातही जागा मिळणार नाही; शिवसैनिकांनी फुटीर खासदारांचं श्राद्ध घालून बोंबा मारल्या

Kolhapur Accident News: इचलकरंजी एसटी डेपोत भीषण अपघात, कार गर्दीत घुसली, लोकांना चिरडलं, सहा जण जखमी

Operation Tiger UBT Shivsena: उद्धव ठाकरेंना दगा देणाऱ्या संजय दिना पाटलांच्या लेकीचं बुचकाळ्यात टाकणारं ट्विट, नगरसेविका राजोल पाटील कोणत्या गटात?

ठाकरेंच्या खासदारांनंतर थेट फुटणार शरद पवार गटातील तब्बल इतके खासदार, थेट तारीखही पुढे..

गद्दार बदलले, चेहरे बदलले पण विचार नाही.. ठाकरे गटाकडून सणसणीत चपराक, मुंबईभर बॅनर्स लावत हल्लाबोल

Solapur : अदृश्य शक्तीनं आम्हाला साथ दिली, दुष्काळात ‘वसंत’ बहरेल, धैर्यशील मोहिते पाटलांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास