टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Operation Tiger UBT Shivsena: उद्धव ठाकरेंना दगा देणाऱ्या संजय दिना पाटलांच्या लेकीचं बुचकाळ्यात टाकणारं ट्विट, नगरसेविका राजोल पाटील कोणत्या गटात?

On: June 19, 2026 11:36 AM
Follow Us:

Operation Tiger UBT Shivsena: संजय दिना पाटील यांनी मातोश्रीवरील बैठकीत शपथ घेऊन तुमची साथ सोडणार नाही, असा शब्द उद्धव ठाकरे यांना दिला होता. मात्र, त्यानंतर ते शिंदे गटात गेले.

Operation Tiger UBT Shivsena: एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’मध्ये गळाला लागलेले ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांची लेक आणि ठाकरे गटाकडून नगरसेविका असलेल्या राजोल पाटील यांच्या एका ट्विटने राजकीय वर्तुळात संभ्रम निर्माण केला आहे. संजय दिना पाटील (MP Sanjay Dina Patil) यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात जाण्याचे स्पष्ट केल्यानंतर त्यांची मुलगी राजोल पाटील यादेखील त्यांच्यासोबत जाईल, असा कयास होता. मात्र, शुक्रवारी शिवसेनेच्या वर्धापनदिनी राजोल पाटील (Rajool Patil) यांच्या ठाकरे गटाला शिवसेना वर्धापनदिनाच्या (Shivsena Vardhapan Din) शुभेच्छा देणारी पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे राजोल पाटील या  ठाकरेंच्या शिवसेनेसोबत की शिंदे शिवसेनेसोबत आहेत, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याबाबत जाणून घेण्यासाठी राजोल पाटील यांच्याशी संपर्क केला असता तो होऊ शकलेला नाही. त्यामुळे राजोल पाटील नक्की कोणत्या पक्षात आहेत, याबाबत शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये सुद्धा या सगळ्या संदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे. (Maharashtra Politics News)

गेल्या काही वर्षांमध्ये भाजपचा बालेकिल्ला झालेल्या ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात 2024 च्या निवडणुकीत संजय दिना पाटील ठाकरे गटाकडून रिंगणात उतरले होते. या मतदारसंघात भाजपची मोठी ताकद आणि गुजराती-मारवाडी ही पारंपारिक व्होटबँक मोठ्याप्रमाणावर आहे. त्यामुळे भाजपचे पारडे जड मानले जात होते. मात्र, महाविकास आघाडीच्या एकत्रित ताकदीच्या जोरावर संजय दिना पाटील यांनी या मतदारसंघात अनपेक्षितपणे विजय मिळवला होता. यानंतर मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे गटाने त्यांच्या मुलीलाही उमेदवारी दिली होती. मात्र, या सगळ्यानंतरही संजय दिना पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यामुळे ईशान्य मुंबईतील ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते संतापले होते. आम्ही उन्हातान्हात फिरुन संजय दिना पाटील यांच्यासाठी प्रचार केला आणि आता तेच शिंदे गटात जाऊन भाजपसोबत गेल्याची खंत अनेकांनी बोलून दाखवली होती.

Sanjay Dina Patil: संजय दिना पाटील शेवटपर्यंत खोटं बोलत राहिले अन् शेवटी शिंदे गटात गेले

ऑपरेशन टायगरची कुणकुण लागल्यानंतर 14 जूनला मातोश्रीवर बैठक बोलावण्यात आली होती. या बैठीकाला संजय दिना पाटील हजर होते. तेव्हा संजय दिना पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर मी तुमच्यासोबत राहीन, अशा आणाभाका घेतल्या होत्या. ठाकरे गटाचे खासदार फुटल्याची माहिती बाहेर आल्यानंतरही संजय दिना पाटील आपण शिंदे गटात गेलो नाहीत, असे खोटं  सांगत राहिले. शुक्रवारच्या बैठकीला आपण उपस्थित राहणार असल्याचं ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी आधीच स्पष्ट केलं होतं. मात्र, ते बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे बैठकीच्या ठिकाणाहूनच त्यांना फोन लावण्यात आला. त्यावर आपण विमान पकडून लगेच बैठकीला येत असल्याचं संजय दिना पाटील यांनी सांगितलं. बैठकीला येणार असं शेवटपर्यंत म्हणणारे संजय दिना पाटील हे काही उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now