टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Operation Tiger UBT Shivsena: मोठी बातमी : ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांचा गट स्थापन, आता शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होणार!

Operation Tiger UBT Shivsena: ऑपरेशन टायगर अखेर फत्ते! ठाकरे गटाच्या 6 बंडखोर खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्षांची मंजुरी. शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होण्याचा मार्ग मोकळा

Operation Tiger UBT Shivsena: उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेल्या सहा खासदारांनी अखेर दिल्लीत लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांना भेटून आपण स्वतंत्र गट स्थापन करत असल्याचे पत्र दिले. लोकसभा अध्यक्षांनी या स्वतंत्र गटाला मंजूरी दिली असून बंडखोर खासदारांच्या स्वतंत्र गटाच्या स्थापनेची प्रक्रिया दिल्लीत पूर्ण झाली आहे. त्यानंतर हा गट एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत विलीन होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. काल रात्रीपासून ठाकरे गटाचे फुटीर खासदार एक-एक करुन दिल्लीत दाखल व्हायला सुरुवात झाली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील काल रात्री दिल्लीत दाखल झाले होते. यानंतर ठाकरे गटाच्या बंडखोर खासदारांना अज्ञातस्थळी ठेवण्यात आले होते. काहीवेळापूर्वीच या सहा बंडखोर खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला (Omprakash Birla) यांची भेट घेऊन आपला स्वतंत्र गट स्थापन करत असल्याचे पत्र सादर केले. लोकसभा अध्यक्षांच्यादेखत बंडखोर आमदारांनी पत्रावर सह्या केल्या. त्यामुळे या खासदारांच्या स्वतंत्र गटाला लोकसभा अध्यक्षांनी मान्यता दिली. (Maharashtra Politics)

पक्षांतरबंदी कायद्यानुसार, स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी आमदार किंवा खासदार संख्येच्या एकूण संख्याबळाच्या दोन तृतीयांश संख्याबळाची गरज असते. ठाकरे गटाचे एकूण नऊ खासदार आहेत. यापैकी सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केला आहे. त्यामुळे या गटाला अधिकृत मंजुरी मिळाली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा सुरु होती. मात्र, दिल्लीतील भाजपश्रेष्ठींना या ऑपरेशनला ग्रीन सिग्नल दिला नव्हता. अखेर 10 जून रोजी दिल्लीत झालेल्या एनडीएच्या बैठकीनंतर अमित शाह यांनी पंतप्रधान मोदींंशी बातचीत करुन या ऑपरेशनला ग्रीन सिग्नल दिला. यानंतर दिल्लीतील एका हॉटेलमध्ये ठाकरे गटाचे बंडखोर खासदार एकनाथ शिंदे यांना भेटले होते, त्यानंतर ऑपरेशन टायगरला खऱ्या अर्थाने वेग आला होता.

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut on Operation Tiger: उद्धव ठाकरेंनी तुमच्यावर भावासारखं प्रेम केलं, पण हे भोसxxx यांच्या अंगात गद्दारी भिनलीय; संजय राऊतांची फुटीर खासदारांवर आगपाखड

Ubt Split : ठाकरेंसोबत असलेले खासदार राजाभाऊ वाजे यांच्या वडिलांचा ऑफरबाबत खळबळजनक गौप्यस्फोट, ‘एकनाथ शिंदेंनी आमच्याशी..’

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Omraje Nimbalkar and Aaditya Thackeray: पक्ष सोडताच ओमराजे निंबाळकरांचा पहिला वार, म्हणाले, उद्धव ठाकरेंचं समजू शकतो, पण आदित्य ठाकरेंनी….

Operation Tiger UBT Solapur : अरे ओमराजे स्वर्गात तरी गद्दारी करु नको; संजय जाधवा, वाकचौऱ्या… तुम्हाला नरकातही जागा मिळणार नाही; शिवसैनिकांनी फुटीर खासदारांचं श्राद्ध घालून बोंबा मारल्या

Kolhapur Accident News: इचलकरंजी एसटी डेपोत भीषण अपघात, कार गर्दीत घुसली, लोकांना चिरडलं, सहा जण जखमी

Operation Tiger UBT Shivsena: उद्धव ठाकरेंना दगा देणाऱ्या संजय दिना पाटलांच्या लेकीचं बुचकाळ्यात टाकणारं ट्विट, नगरसेविका राजोल पाटील कोणत्या गटात?

ठाकरेंच्या खासदारांनंतर थेट फुटणार शरद पवार गटातील तब्बल इतके खासदार, थेट तारीखही पुढे..

गद्दार बदलले, चेहरे बदलले पण विचार नाही.. ठाकरे गटाकडून सणसणीत चपराक, मुंबईभर बॅनर्स लावत हल्लाबोल