टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

मोठी बातमी! भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला, पिकअप वाहन विहिरीत पडले

On: June 14, 2026 9:27 PM
Follow Us:

म्हसवड येथील सिद्धनाथाच्या दर्शनासाठी भाविक आले असताना येथील विहिरीत त्यांचे पिकअप वाहन पडले.

भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला, 14 जणांचा जागीच मृत्यू; देवदर्शनावरून परतताना काळाचा घाला

सोलापूर : जिल्ह्यातील पंढरपुरात मोठी दुर्घटना (Accident) घडली असून एका विहिरीत पिकअप पडल्याने 8 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पंढरपूर तालुक्यातील म्हसवड-पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावाजवळ पिकअप गाडी विहिरीत पडून मोठा अपघात झाला. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला असून सर्वजण पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील रांजणी गावचे रहिवासी असल्याचे समजते. विहिरीतून क्रेनद्वारे सुरुवातीला पिकअप जीप बाहेर काढली जाईल, त्यानंतर विहिरीत उतरून मृतदेह बाहेर काढले जातील, अशी माहिती आहे. स्थानिकांच्या मदतीने 6 जणांना वाचविण्यात यश आलं आहे.

म्हसवड येथील सिद्धनाथाच्या दर्शनासाठी भाविक आले असताना येथील विहिरीत त्यांचे पिकअप वाहन पडले. गावाकडे परत येत असताना माळशिरस तालुक्यातील तांदळवाडी गावानजीक एका विहिरीत पिकअप गाडी पडल्याने ही दुर्घटना घडली. त्यानंतर, स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. मात्र, वाहनातील भाविकांची मृत्यू झाल्याची माहिती आहे. घटनास्थळावर परिस्थिती भीषण असून पिकअपमधील सर्वच भाविक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचलं आहे. अग्निशामक दलाची यंत्रणा बोलावली आहे. प्रांताधिकारी, जिल्हा प्रशासनाची टीम रवाना झाली आहे. विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरु झालं आहे.

दरम्यान, येथील विहिरीजवळ यापूर्वी अपघात झालेले नाहीत. यापूर्वी इथं अपघात झाला नव्हता. हा पहिलाच अपघात असल्याचं स्थानिकांकडून सांगण्यात आलं आहे.

8 जणांचा मृत्यू

समोर आलेल्या माहितीनुसार, माळशिरस तालुक्यातील म्हसवड पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावाजवळ पिकअप वाहन विहिरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. यात पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावातील 8 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये म्हसवड येथील सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांचा समावेश आहे. गावाकडे परत येत असताना माळशिरस तालुक्यातील तांदळवाडी गावानजीक हा अपघात झाला आहे.

8 जणांचे मृतदेह सापडले

या अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. ही विहीर रस्त्याच्या कडेला होती. भाविकांसह पिकअप वाहन या विहिरीत कोसळले. ही विहीर पाण्याचे तुडुंब भरलेली होती. या विहिरीला कोणतेही कठडे नव्हते, त्यामुळे पिकअप थेट पाण्यात गेले आणि या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेतील 8 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असल्याचीही माहिती समोर आली आहे.

मृतांमध्ये महिला आणि मुलांचाही समावेश

या अपघाताची माहिती समोर येताच प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. या घटनेतील मृतांमध्ये 4 लहान मुलांचा आणि 4 महिलांचा समावेश आहे. तसेच या घटनेत 6 जण बचावले असल्याचीही माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर विहिरीभोवती लोकांनी गर्दी केली आहे, सर्वजण मदतकार्यात व्यस्त आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now