टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

30 नोव्हेंबरपासून या iPhone वर बंद होणार WhatsApp सपोर्ट! वेळीच करा हे महत्त्वाचं काम, अन्यथा…

WhatsApp Update: तुम्ही आयफोन यूजर आहात का? तुम्ही देखील तुमच्या आयपोनमध्ये व्हॉट्सॲपचा वापर करताय का? तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मेटाने घोषणा केली आहे की, 30 नोव्हेंबरनंतर काही जुन्या आयफोन मॉडेल्सवरील व्हॉट्सॲप सपोर्ट बंद केला जाणार आहे.

30 नोव्हेंबरपासून या iPhone वर बंद होणार WhatsApp सपोर्ट! वेळीच करा हे महत्त्वाचं काम, अन्यथा...
  • 30 नोव्हेंबरनंतर व्हॉट्सॲप वापरण्यासाठी आयफोनमध्ये किमान iOS 15.5 किंवा त्यानंतरचे वर्जन असणे आवश्यक असणार आहे.
  • आयफोन 5s, आयफोन 6, आयफोन 6 एस, आयफोन SE (1st जेन), आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लस यूजर्सना डिव्हाईस अपडेट करावे लागणार आहे.
  • व्हॉट्सॲप सपोर्ट सुरू ठेवण्यासाठी यूजर्सना 30 नोव्हेंबरपूर्वी उपलब्ध iOS अपडेट इंस्टॉल करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

WhatsApp For iPhone: तुम्ही देखील एखाद्या जुन्या आयफोन मॉडेलचा वापर करत आहात का? तर तुमच्यासाठी वाईट बातमी आहे. टेक कंपनी मेटाने घोषणा केली आहे की, 30 नोव्हेंबरपासून काही आयफोन आणि आयपॅड्सवर व्हॉट्सॲप सपोर्ट बंद केला जाणार आहे. या आयफोन आणि आयपॅड यूजर्सकडे व्हॉट्सॲप सपोर्ट सुरु ठेवण्यासाठी iOS 15.5 किंवा त्यानंतरचे वर्जन आणि iPadOS 15.5 किंवा त्यानंतरचे वर्जन असणं आवश्यक आहे. अ‍ॅपलच्या जुन्या ऑपरेटिंग सिस्टिमवर चालणाऱ्या डिव्हाईसचे यूजर्स जोपर्यंत त्यांचे डिव्हाईस अपडेट करत नाहीत, त्यांना व्हॉट्सॲप सपोर्ट मिळणार नाही.

कंपनीने दिला 30 नोव्हेंबरपर्यंत वेळ

आता आयफोन यूजर्सना, 30 नोव्हेंबरनंतर व्हॉट्सॲपचा वापर करण्यासाठी आयफोनवर नवीन आयओएस वर्जनची आवश्यकता असणार आहे आणि जुन्या आयओएस वर्जनवर आता व्हॉट्सॲप काम करणार नाही. त्यामुळे जर तुम्ही जुन्या आयफोनचा वापर करत असाल तर कंपनीने तुम्हाला डिव्हाईस अपडेट करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत वेळ दिला आहे. यापूर्वी, कंपनीने iOS 15.1 पेक्षा जुन्या वर्जन्ससाठी व्हॉट्सॲप सपोर्ट बंद करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे आयफोन 5s, आयफोन 6 आणि आयफोन 6 प्लस सोबतची त्यांची कंपॅटिबिलिटी संपली होती.

आयफोन बदलण्याची नाही केवळ अपडेट करण्याची आवश्यकता

सहसा नवीन फीचर्स आणण्यासाठी आणि सायबर क्राईमपासून सुरक्षित राहण्यासाठी वेळोवेळी जास्त जुन्या ऑपरेटिंग सिस्टिमवरील व्हॉट्सॲप सपोर्ट बंद केला जातो. मात्र कंपनी यावेळी असं करणार नाही. सध्या जे डिव्हाईस iOS 15.1 वर्जनवर चालू आहेत, त्या सर्वांना iOS 15.5 वर्जनवर अपडेट केले जाऊ शकते. याचा अर्थ असा आहे की, जुन्या आयफोन यूजर्सना व्हॉट्सॲपचा वापर सुरु ठेवण्यासाठी त्यांचा आयफोन बदलण्याची नाही केवळ अपडेट करण्याची आवश्यकता आहे.

कोणत्या आयफोन मॉडेल्सवर होणार परिणाम?

आयफोन 5s, आयफोन 6, आयफोन 6 एस, आयफोन 6 एस प्लस, आयफोन SE (1st जेन), आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लस वापरणाऱ्या यूजर्सवर कंपनीच्या या निर्णयाचा परिणाम होणार आहे. जर यूजर्स या आयफोन मॉडेल्समध्ये जुन्या आयओएस वर्जनचा वापर करत असील तर त्यांना आयओएस 15.8.8 वर्जनवर अपडेट करावे लागणार आहे. या अपडेटनंतर यूजर्सना त्यांच्या आयफोनमध्ये व्हॉट्सॲपचा वापर करताना कोणतीही समस्या येणार नाही. पण हे काम लवकरात लवकर करावे लागणार आहे. कारण कंपनीने यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंतची वेळ दिली आहे.

आयफोन अपडेट करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

इतर स्मार्टफोन्सप्रमाणेच आयफोन अपडेट करणं देखील अत्यंत सोपं आहे. जेव्हा आयफोनमध्ये नवीन अपडेट उपलब्ध असते, त्यावेळी आयफोन स्वत: याबाबत नोटिफिकेशन पाठवून यूजर्सना माहिती देतो. जर तुम्हाला मॅन्युअली आयफोन अपडेट करायचा असेल तर सेटिंगमध्ये जाऊन जनरल सेक्शन ओपन करा. यामध्ये सॉफ्टवेयर अपडेट पर्याय निवडा. आता तुमच्या स्क्रीनवर आयफोनसाठी उपलब्ध असलेले अपडेट दिसेल, ते इंस्टॉल करा. आयफोनमधील लेटेस्ट फीचर्सचा फायदा घेण्यासाठी आणि सायबर धोक्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी तज्ज्ञ सॉफ्टवेयर आणि अ‍ॅप्स नेहमी अपडेटेड ठेवण्याचा सल्ला देतात.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now