टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Gold Rate Today : सोने आणि चांदीच्या भावात मोठे बदल, सोन्याचा भाव उच्चांकापेक्षा..

Gold Rate Today : सोने आणि चांदीच्या भावात गेल्या काही दिवसांपासून मोठी चढउतार बघायला मिळतंय. त्यामध्येच आता सराफा व्यापारामध्ये मोठी तेजी बघायला मिळतंय. सोन्याचे भावात वधारले आहेत.

Gold Rate Today : सोने आणि चांदीच्या भावात मोठे बदल, सोन्याचा भाव उच्चांकापेक्षा..

इराण आणि अमेरिकेच्या युद्धात सोन्याच्या भावात मोठी चढउतार बघायला मिळतंय. इराणवर अमेरिकेने हल्ला केला किंवा तणाव वाढला की, सोन्याचे भाव कमी होतात. युद्धविरामाबाबत चर्चा झाली की, बैठक झाली तर लगेचच सोन्याचे दर वाढत आहेत. यादरम्यानच आता सराफा बाजारात मोठ्या घडामोडी घडत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव सतत कमी होताना दिसले. मागील काही महिन्याचा विचार करता थेट सोन्याचे भाव घसरले. अमेरिकेचे अध्यक्षांनी इराणसोबतच्या युद्धाबाबत मोठे विधान केले. त्यांनी म्हटले की, याच आठवड्याच्या शेवटी इराणसोबत युद्धविराम करार पूर्ण होऊ शकतो. कधी आणि कुठे हे लवकरच जाहीर केले जाईल. अमेरिकेच्या अध्यक्षांच्या या घोषणेनंतर सोन्याच्या भावात आज मोठी तेजी दिसून आली. गेल्या काही दिवसांपासून घसरणाऱ्या भावात तेजी दिसून आली.

जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली. सोन्याच्या दरात 2 हजार रूपयांनी तर चांदीच्या दरात 6 हजार रुपयांनी वाढले. सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 51 हजार 616 रुपये आहे. चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 51 हजार 320 रुपयांवर पोहोचला आहे.सलग तीन दिवस सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्यानंतर आज पुन्हा वाढ झाली आहे.

मागील तीन दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात सतत घसरण होत होती. अखेर आज तेजी दिसून आली. अमेरिका इराण यांच्यातील युद्ध पुन्हा थांबल्याने त्याचा परिणाम सोन्या चांदीच्या दरावर झाल्याचे सराफ व्यवसायिक यांचा म्हणणं आहे. इराण आणि अमेरिका युद्ध सुरू होण्यापूर्वी सोन्याचा भाव दोन लाखाच्या आसपास पोहोचला होता. मात्र, अचानक युद्धाला सुरूवात झाली आणि भाव कमी झाले.

युद्ध पूर्णपणे थांबले तर सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ होईल. त्याच केंद्र सरकारने सोन्याचा आयात कर 6 टक्क्याहून 15 टक्क्यावर नेला आहे. मात्र, सोने अजूनही त्याच्या उच्चांकापेक्षा 55 हजाराहूनही अधिक कमी आहे. पुढील काही दिवसात सोन्याच्या किमतीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. तसा अंदाज वर्तवला जात आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now